मनपाच्या बंद असलेल्या शाळेच्या जागेवर भु माफियांचा डोळा
उल्हासनगर महानगरपालिकेच्या अनेक वर्षांपासून शाळा बंद असलेल्या जागेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न काही शहरातील भूमाफिया करत असल्याचे आरोप मनसे विध्यार्थी सेनेचे शहरअध्यक्ष यांनी केले आहेत व तसे प्रयत्न करणाऱ्या भु माफियांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांना केली आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या रानीलक्ष्मी बाई या शाळेच्या दोन इमारती असून आहेत त्यामधील एका इमारतीची पडझड झाली होती ही शाळा उल्हासनगर कॅम्प नंबर एक इथल्या बेवस चौका जवळ असून त्यामधील एक शाळा इमारत अनेक वर्षांपासून बंद आहे या संधीचा फायदा घेत काही भु माफियांनी राणी लक्ष्मीबाई या शाळेचं नुकसान करून ती पडून ती जागा सपाट करून हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत या भूमाफिया वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विध्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष मनोज शेलार यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहेउल्हासनगर महानगरपालिकेची शाळा काही भूमाफियांनी मोडतोड करून हडप करण्याचा प्रयत्न केला आहे अशा आरोप मनसे विद्यार्थी सेना कडून करण्यात आले आहेत या संदर्भात माननीय आयुक्त यांना निवेदन देऊन तोडफोड करणाऱ्या ठेकेदारावर तीही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे
सदर शाळा ही मनपाने ताब्यात घेऊन त्याला कुंपण घालून महापालिकेने अंगणवाडी सुरू करावी जेणेकरून गरीब मुले अंगणवाडी शिक्षण घेतील असं या निवेदनात नमूद करण्यात आले आता महापालिका कोणता निर्णय घेईल हेच बघावे लागणार आहे
उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक तीन राणी लक्ष्मीबाई हिंदी विद्यालय होते आणि आता पण आहे पण ती शाळा दोन भागात विभागली गेली आहे . राणी लक्ष्मीबाई विद्यालय होतं एका बाजूला महानगर पालिकेने पहिली ते सातवी पर्यंत आणि एका बाजूला अंगणवाडी बालवाडी होती पण कालांतराने तेथील विद्यार्थी पटसंख्या कमी झाली त्याच्यामुळे त्यांनी ती शाळा बंद केली बंद केली.ही मनपाच्या मालकीची असलेल्या जागेवर काही भूमाफियांचा डोळा गेला आणि त्या जागेचे नकली, बोगस पेपर बनवून होती प्रॉपर्टी महानगरपालिकेची आहे ती बंद केली पेपर बनवलेले मनपाला असलेली चार पाच दिवसाची सुट्टी बघून या शाळेत असलेले शालीय उपयोगी सामान, टेम्पोत भरून चोरी करून नेण्यात आले आहे. या संदर्भात माहिती मिळाल्या नंतर आम्ही आयुक्त उपायुक्त यांची भेट घेतली त्या शाळेच्या जागेवर ती अंगणवाडी बालवाडी सुरू करावी आणि तो पूर्ण भूखंड महानगरपालिकेने स्वतः घ्यावा आणि तेथे महानगर पालिकेने अंगणवाडी किंवा बालवाडी बनवावी अशी विनंती केली आहे त्याबाबत लेखी निवेदन दिले आहे असे शेलार यांनी सांगितले