देशात कोरोना साथीचे रुग्ण जेवढ्या वेगाने फैलाव होत आहे. तेवढयाच वेगात लॉकडाउन मध्ये थोडी ढील फायदा काही अवैध व्यवसाय करणारे घेत असून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा चोरीच्या मार्गाने आणला जातो. चोरीच्या मार्गाने गुटखा येत असल्याची खबर काशिमिरा पोलिसांना मिळताच तात्काळ पावले उचलत मुद्देमालासह गाडी ताब्यात घेतली आहे आणि काशीमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चालला असतानाच दुसरीकडे मिरा-भाईंदर शहरात अवैध व्यवसायिकांनी चांगलेच डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अवैद्यपणे गुटखा भरलेली गाडी असल्याची माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेश पानसरे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी तात्काळ पावले उचलत सदर बाबीची शहानिशा केली असता, क्रेटा नावाच्या चारचाकी एम एच 04 जे एम 6499 या नंबरच्या वाहनातून गोण्यात भरून वाहतूक करणाऱ्या तिन व्यति विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये (1)सुजित हरिहर चौरसीया, वय 30, राहणार मिरारोड,( 2) शाफिक अहमद शेख वय 50 राहणार मिरारोड (3) मोहन राहणार वसई या तीन आरोपी विरुद्ध काशिमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद. रजी. क्रमांक TT 614/2020 भादवी कलम 328 , 272,273 ,188,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त केलेल्यामध्ये तीन प्रकारचा माल मिळून आला आहे. ज्यामध्ये सोळाहजार पाचशे रुपये किमतीचा विमल गुटख्याची एक गोणी ज्यामध्ये पन्नास पाकिटे, एकवीस हजार रुपये किमतीच्या दोन गोण्या शिखर नावाचा गुटखा त्यात शंभर पाकिटे मिळाली तर एक हजार शंभर रुपये किमतीची व्ही-1 नावाची तंबाकू पाऊच भरलेली एक गोणी मिळून आली आहे. अशा हा महाराष्ट्रात बंदी असलेला व मानवी जीवनास अपाय कारक असलेला 38600 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच बरोबर हा गुटखा वाहतूक करणारी क्रेटा नावाची एम एच 04 जे एम 6499 या नंबरची सिल्वर रंगाची पाच लाख किंमत असलेली गाडी ही पोलिसांनी जप्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस काशिमीरा पोलिस करत आहेत.