रिपब्लिकन सेनेच्या वतीने रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्याचे मोफत वाटप


 


स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधत व रिपब्लिकन सेनेचे झुंजार लोकनेते विजय वाकोडे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा येथे रिपब्लिकन सेनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या वतीने मोफत रोगप्रतिकारक होमिओपॅथी गोळ्यांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. 


 


परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे रिपब्लिकन सेना पूर्णा महिला आघाडीच्यावतीने आयोजित स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला व रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष झुंजार लोकनेते विजय वाकोडे यांच्या वाढदिवसानिमित्त रोग प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या होमिओपॅथी गोळ्या शहरात घरोघरी जाऊन मोफत वाटप करण्यात आल्या व शहरातील व्यापारी वर्ग,किरण दुकानदार, आणि भाजीपाला विक्रेते यांनाही या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. व वृक्षारोपनाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच विविध कार्यक्रम घेऊन स्वातंत्र्य दिन व विजय वाकोडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अनेक महिला पदाधिकारी व युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पाडला. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी हे आवर्जून उपस्थित होते तर चंद्रमणी लोखंडे, अनिल नरवाडे युवानेते आनंद कनकुटे , विजय खंडागळे ,नामदेव कनकुठे,


संतोष कांबळे,महिलाआघाडी


तालुकाअध्यक्षा पंचशीलाताई वाघमारे, शहरआघाडी शहराध्यक्ष शोभाताई डोंगरे, तालुका सचिव वंदनाताई गायकवाड, एगडेताई आदि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते महिला उपस्थित होते.