मिरा-भाईंदर मनपाची परिवहन सेवा कधी होणार सुरू ?
मीरा भाईंदर महानगरपालिकेची असलेली परिवहन सेवा लॉकडाऊन लागू झाल्यापासून कोरोना प्रादुर्भाव वाढुनये म्हणून बंद ठेवली गेली होती तर, आता लॉकडाउन शिथिल केल्यानंतरही मीरा भाईंदरमधील परिवहन सेवा सुरू करण्यात आली नाही, एमबीएमटी सुरू करावी अशी मागणी शिवसेने कडून करण्यात आली होती तरीही एमबीएमटी सेवा सुरू केली नाही त्यामुळे नागरिकांची इतर प्रवासी वाहतूक कारणाने लूट करत असतात त्यामुळे आयुक्तांनी ठेकेदाराला धारेवर धरले आणि काळ्यायादीत टाकले जाईल असा दम ही भरला आहे. लवकर परिवहन सेवा सुरू करा असे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील परिवहन सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना अडचणी येत आहेत. त्याच बरोबर इतर प्रवाशी वाहतूक करणारे जी साधने उपलब्ध आहेत ते मात्र या परस्थितीचा फायदा उचलत प्रवाशांची मानभाव भाडे घेऊन लूट करत असल्यामुळे शिवसेने कडून लेखी पत्र देऊन परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्या अनुषंगाने आयुक्तांनी बैठक बोलवून लवकर बस सेवा सुरू करा अन्यथा काळ्यायादीत टाकू असा सज्जड दम देखील भरल्याचे समजते आहे.सध्या काही बसेस ह्याअत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहेत. परंतु, लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतरही सामान्य माणसाला प्रवासासाठी खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे भाईंदर पश्चिममधील उत्तन पाली मुर्धा राई, मिरारोड मधील काशीमीरा, पेनकार पाडा, चेना या भागातील सामान्य नागरिकांना खाजगी रिक्षाचा दर परडवणारा नसून परिवहन सेवा सुरु व्हावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. मीरा भाईंदर प्रशासनाने ठेकेदारला सामाजिक अंतर पालन करून परिवहन सुरू करण्यास सांगितले आहे. मात्र, दर परवडणारा नाही, म्हणून प्रशासनाने दरात वाढ करावी. सामाजिक अंतर राखून सेवा सुरू केली तर, परवडणारे नाही, नुकसान होणार आहे.त्यामुळे नवीन करारनामा करून आम्हाला वाढीव दर द्या, अशी मागणी ठेकेदार मनोहर सकपाळ यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यामूळेच बस सेवा सुरू करण्यासाठी ठेकेदाराकडून चाल ढकल केली जात आहे. आयुक्त दालनात ठेकेदार आणि शिवसनेनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यावेळी आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी परिवहन सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. तर, कंत्राटदारांनी कोरोना महामारीच्या काळात नवीन करारनामा करून द्यावा, अशी मागणी केली आहे. सरकार आणि ठेकेदाराच्या वादात जनतेला मात्र नाहक भुरदंड पडताना दिसतो आहे.