मिरा-भाईंदर शहरात आता पर्यंत साडे आठ हजारापेक्षा अधिक रुग्णांनी कोरोना विषाणूवर केली मात

मिरा-भाईंदर शहरात आता पर्यंत साडे आठ हजारापेक्षा अधिक रुग्णांनी कोरोना विषाणूवर केली मात


 


मिरा-भाईंदर मनपा कार्यक्षेत्रातील आजपर्यंतच्या मनपाने दिलेल्या आकडेवारी नुसार शहरातील (दि.१५) कोरोना विषाणूवर मात करणार्‍या रूग्णांची संख्या साडे आठ हजाराच्या पार गेली आहे. तर कोरोना बधितांच्या संख्येने साडे दहा हजार आकडा पार केला आहे तर आजच्या कोरोना बाधित रुग्ण संख्या १६८ मिळून आली आहे.


 


कोरोनाच्या भीतीने मनात घर केले आहे भिती मनातून निघत नाही असेचित्र निर्माण झाले आहे तरीही या परस्थितीचा सामना करावा लागनार आहे संपूर्ण शहर कोरोनासी लढा देत आहे. मात्र रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळवण्यात अद्याप ही म्हणावे तसे यश आले नाही करोडो रुपये खर्च करून कोविड सेंटर बनवले गेले आहे त्याचे उदघाटन ही करण्यात आले पण त्याचा वापर सुरू झाला नाही. खासगी रुग्णांलयाकडून होणारी लूट थांबवण्यासाठी हे पाऊल टाकले गेले खरे पण म्हणावा तसा परिणाम मात्र जाणवत नाही. आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टच्या आधारे शहरात एकूण १६८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक रूग्ण हे संपर्कात आलेले आहेत. आज १६७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजवर या विषाणूला हरविणार्‍या रूग्णांचा आकडा ८६४७ म्हणजेच साडे आठ हजारांच्या पार गेला आहे. तर आता पर्यंत शहरात कोरोनाची लागण झालेली संख्या ही साडे दहा हजाराच्या पुढे म्हणजे १०,५६० एवढा झाला आहे. कोरोनामुळे आजपर्यंत शहरात एकूण मृत्यू ३५८ झाले आहेत पण आजच्या दिवशी आतापर्यंतच्या दिवसा पेक्षा आजसर्वधिक रूग्ण मृत्यू पावले आहेत चोवीस तासातम्हणजेच दिवसभरात मृत्यू झालेल्याची संख्या ही ११ एवढी आहे.


 तर सध्या उपचारासाठी दाखल आसलेले एकून रुग्ण हे १५५५ आहेत.