देशात स्वच्छता सर्वेक्षण २०२० मध्ये मिरा-भाईंदर एकोणिसाव्या तर राज्यात चौथ्या क्रमांकावर

देशात स्वच्छता सर्वेक्षण २०२० मध्ये मिरा-भाईंदर एकोणिसाव्या तर राज्यात चौथ्या क्रमांकावर


 


स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशामध्ये कोणकोणते शहर आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा देशात मान मिळवला याची नोंद केली जाते त्यामध्ये देशात मिरा-भाईंदर शहर हे १९व्या क्रमांकावर तर महाराष्ट्र राज्यात ४ क्रमांकावर आले आहे. ही मेहनत शहरातील सफाई कामगार आणि नागरिकांनची यांची आहे असे उदगार महापौर सह शहरातील सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 


 


देशात सर्वात स्वच्छता ठेवण्यात अव्वल ठरलेले शहर हे मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर आहे शहर सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घेण्याचा मान या शहराला मिळाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर गुजरातमधील सूरत शहर आहे. स्वच्छता सर्वेक्षण २०२० मध्ये एक लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या कॅटगरीमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरची निवड करण्यात आली आहे. तर दुसऱ्या स्थानी गुजरातमधील सूरत शहराची निवड करण्यात आली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडण्यात आलं आहे. पंतप्रधान यांनी 'स्वच्छ सर्वेक्षण


२०२० 'मध्ये या निवडी ची घोषणा केली. या दरम्यान स्वच्छतेसाठी उत्तम उपाययोजना करणाऱ्या शहरांचाही गौरव करण्यात आला आहे. तर देशाच्या १९ व्या स्थानावर व राज्यात चौथ्या स्थानार मिरा-भाईंदर हे शहर आहे.