मिरारोड - कोविड-१९ मुळे देशात, राज्यात टाळेबंदी करण्यात आली होती. संसर्गाचा धोका वाढुनये म्हणून खबरदारी, उपाययोजना म्हणून सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी क्लासेस बंद ठेवण्याचे असतानाही काशिमिरा पेणकर पाडा येथील एक खासगी शिकवणी क्लास बिनधास्तपणे सुरु असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनपाने या क्लास वर गुन्हा दाखल केला आहे.
शहरी भागात खासगी शिकवणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालवला जातो. खासगी शिकवणीचे वर्ग शाळेसारखेच खचा खच भरलेले असतात. पण कोविड-१९ च्या साथीमुळे या खासगी चालणाऱ्या शिकवणी वर्गावरही बंदी घालण्यात आली असतांनाही शासनाचे आदेश धुडकावात पेणकर पाडा चिमाजीनगर येथे ठाकूर अकॅडमी नामक क्लास कडून खासगी शिकवणीचे वर्ग सुरू सुरू असल्याची माहिती नगरसेवक परशुराम म्हात्रे यांना मिळाली त्यांनी शहानिशा करून मिरा-भाईंदर मनपाचे आयुक्त डॉ विजय राठोड यांच्याकडे तक्रार करत सदर खासगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या क्लास वर मागणी केली त्यानुसार मनपाने तात्काळ दखल घेत पावले उचलत परशुराम म्हात्रे मागणीवरून मनपा प्रभाग कार्यालय क्रं. सहाच्या अधिकाऱ्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
देशात व राज्यात सगळीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना सुरू आहेत
तर मिरा-भाईंदर शहरातले खासगी शिकवणीचे वर्ग चालवणारे मात्र शासनाच्या नियमाना हरताळ फासतांना दिसत आहेत. खासगी शिकवणीचे वर्ग सुरू ठेवतांना कुठेही सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जात होते, विद्यार्थी एकमेकांच्या शेजारी बसलेले जातात , धक्कादायक बाब म्हणजे क्लासमध्ये शिकताना अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नसतो. काही खासगी शिकवणुकी धारक मंडळी या संकटाळाच्या काळात खासगी शिकवणि घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत असे आरोपही पालकाकडून केला जात आहे. या खासगी शिकवनुकदारांवर काशिमीरा पोलिस ठाण्यात गु र नो क्र. ६५४/२०२० भारतीय दंड संहिता कलम १८८,२६९, २७० साथरोग अधिनियम , कलम २,३,४ प्रमाणे २० ऑगस्ट रोजी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास काशिमीरा पोलिस करत आहेत.