नाल्यात पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांची काँग्रेस जिल्हा अध्यक्ष यांनी भेट घेऊन केले सांत्वन
मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रातिल काशिमीरा महाजनवाडी गावठण भागात नाल्यात पडून राकेश हरसोरा नामक व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे मिरा-भाईंदर शहर अध्यक्ष प्रमोद सामंत यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले व उपाध्यक्ष यांनी अर्थिक मदत करत त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणाची जवाबदारी काँगेस पक्षाच्या वतीने घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
मिरा-भाईंदर महानगर पालिका हद्दीत काशिमीरा विभागात गावठण महाजन वाडी परिसरात ५ ऑगस्ट रोजी पडलेल्या पावसामुळे या परिसरातील नाले तुडुंब भरून आजूबाजूच्या परिसरातून पाणी वाहत होते त्यावेळी अनेकांचे सामान, दुचाकी, तीनचाकी प्रवाहात वाहत जात होत्या स्वतःची दुचाकी नाल्यात वाहून जात असल्याने ती वाचवण्यासाठी गेलेल्या राकेश हरसोरा यांचा नाल्याची जुनी भिंत कोसळून पडल्यामुळे ते नाल्यात पडले आणि प्रवाहात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला होता. या प्रलयात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष मा.मुझफ्फर हुसेन यांच्या मार्गदर्शनानुसार मीराभाईंन्दर शहर अध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सदर कुटुंबाला घरी जाऊन भेट दिली त्यांच्या सोबत पक्षाचे उपाध्यक्ष केशलाल यादव,अनुसुचित जाती सेल चे रवि खरात, ओबीसी सेल चे ब्लॉक अध्यक्ष गणेश लांबे, महिला ब्लॉक अध्यक्ष खातिजा मुलानी ,ओवळा माजिवडा युवक उपाध्यक्ष कुणाल काटकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
सदर प्रसंगी केशलाल यादव यांच्या तर्फे दुर्घटनेतील मयत राकेश हरसोरा यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून १५ हजार रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. व राकेश हरसोरा यांच्या मुलीच्या पुढील शैक्षणिक शिक्षणाची जबाबदारी मीराभाईंन्दर जिल्हा कॉग्रेस पक्षा कडून घेण्याचे आश्वासन जिल्हा अध्यक्ष प्रमोद सामंत यांनी दिले
व येथील रहिवासी यांच्या सोबत दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. ५ ऑगस्टच्या पुरात नुकसान झालेल्या कुटुंबानां व ताबडतोब मदत मिळण्यासाठी पक्ष पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद सामंत यांनी आश्वासन दिले.