२६ वर्षीय तरुणाने वरसावे खाडीच्या पुलावरून खाडीत मारली उडी

२६ वर्षीय तरुणाने वरसावे खाडीच्या पुलावरून खाडीत मारली उडी



पोलिसांचे तपास कार्य सुरू, अद्याप तरी तरुण गायपच


 


ठाणे आणि पालघर जिल्ह्याची सिमा असलेल्या वरसावा खाडीवरील पुलावरून तरुणाने खाडीत उडी मारल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. काशिमीरा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत, सदर तरुणांच्या कुटुंबियांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार नोंदवली आहे.


 


मुंबई अहमदाबाद महामार्गावर ठाणे आणि पालघर जिल्ह्याचि सीमा असलेली वरसावे खाडी मिरा-भाईंदर मनपा व वसई तालुका या दोन्हीच्या हद्दीत येते या खाडीवरील वर्सोवा पुलाच्या ठिकाणी एका दुचाकी वाहनावरून येत खाडीत उडी मारली आहे अशी प्राथमिक काशिमीरा पोलिसांना दुसऱ्या वाहन चालकाने माहिती दिली पोलिस घटनास्थळी पोहचले तेंव्हा त्यांना त्या तरुणांची ऍक्टिवा नावाची दुचाकी वाहन मिळून आले. पण तो तरुण अद्याप तरी मिळून आलेला नाही या वाहनांवरून पोलिसांनी सदर तरुणांचा शोध घेतला असता या तरुणाने नाव संकेत शशिकांत डावल वय वर्षे २६, राहणार बोरीवली पूर्व येथील जगरदेव कंपाऊंड, चाळ नं.१ आकांक्षानगर काजूपडा येथील हा तरुण असून तो काशीमीरा येथील मॅगनेट कंपनीत कामाला होता. २० ऑगस्ट रोजी सकाळी तो घरून ८ वाजता कामावर म्हणून निघाला होता. त्याने खाडीत उडी मारल्याचे दुसऱ्या वाहन चालकाने पाहिले आणि पोलिसांना त्यानीं कळवले होते त्या नुसार पोलिसांनी शोध घेऊन घराच्या मंडळी कडून शहानिशा केली असता ती ऍक्टिवा नावाची दुचाकी संकेत याचीच आहे.हे स्पष्ठ झाले त्यानुसार पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली आहे तर काशीमीरा पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून मिसिंग क्रं. ६६/२०२० असून या घटनेचा पुढील तपास एपीआय महेंद्र भांबरे हे करत आहेत.