मिरा-भाईंदर मध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड हेल्थ सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

मिरा-भाईंदर मध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड हेल्थ सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन



मिरा-भाईंदर मधिल नागरिकांसाठी राज्यशासनाने महाडच्या मदतीने कोविड संक्रमित रुग्णांच्या उपचाराकरीत प्रमोद महाजन सभागृहात व स्व. मीनाताई ठाकरे मंडईच्या ठिकाणी ३६६ खाटांचे समर्पित कोविड हेल्थ सेंटर उभारण्यात आले या हेल्थ सेंटरचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून करण्यात आले.


 


कोविड साथीचा धोका ओळखून तत्कालीन आयुक्त डांगे यांनी मिरा-भाईंदर मधिल एकमेव सरकारी असलेले रुग्णालय हे कोविड साठी घोषित केले तेंव्हापासून या रुग्णालयात अनेक कोविडची लागण झालेले रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता हे रुग्णालय कमी पडू लागले त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्यात यावी यासाठी सरकारने पंधरा करोड रुपये मनपाला देण्याचे जाहीर केले आणि दहा करोड रुपये आत्ता पर्यंत मनपा तिजोरीत जमा देखिल झाले आहेत. पाच करोड रुपये वर्ग करणे बाकी आहेत. वाढते रुग्ण पाहता त्याच पैशातून ३६६ खाटांचे कोविड हेल्थ सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उद्घाटन करण्यात आले आहे.


शहरात सरकारची उपलब्ध नसलेली सोय व कोविड ची भिती नागरिकांच्या मनात असल्यामुळे अनेकजण खाजगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेत होते. पण खाजगी रुग्णालये हे शासनाचे नियम हे डब्यात ठेवत आलेल्या रुग्णांची लूट करत आहेत अशा अनेक तक्रारी मनपात आलेल्या आहेत. अनेकांनी समाज माध्यमातून तसे व्हिडीओ ही वायरल केले आहेत. वाजवी बिला पेक्षा अधिक पटीने बिल घेऊन रुग्णांची लूट सुरू होती. त्यामुळे प्रशासनाने ठोस पाऊले उचलत कोविड हेल्थ सेंटर उभा केले आहे. आजपासून कोविड हेल्थ सेंटर रुगणांसाठी सुरू झाले असून, मीरा भाईंदरमधील शहरातील रुग्णांसाठी ही आशादायक बाबआहे या हेल्थ केयर सेंटरमुळे रुगणांची होणारी लूट थांबेल. अशी अपेक्षा नागरिकांना आहे. उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, आणखी गरज वाटल्यास जागा उपलब्ध करून द्या सरकार मदती साठी तयार आहे. रुग्णालय तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. नागरिकांनी वयक्तिक दुरी ठेवणे गरजेचे असून जनतेत जागृता आणावी, कोरोनाची भीती बाळगूनये तपासणी, व चाचणी घेण्याची गती वाढवा राज्यसरकार कडून औषध, इंजेक्शनचा पुरवठा सुरू करण्यात आला असून राज्यसरकार आपल्या सोबत ठामपणे उभे आहे. या कामात मदतनिधी लागल्यास अपुरी पडून देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले आहे.


यावेळी नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे,खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, गीता जैन, रवींद्र चव्हाण, महापौर जोस्ना हसनाळे उपस्थित होते. तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते.