बेजबाबदार ठेकेदार व अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल
मिरा-भाईंदर मनपाच्या भ्रष्ट्र कारभारावर नेहमीच शिंतोडे उडत असतात. ठेकेदाराशी संगनमत असलेले अधिकारी, त्यांच्या आशीर्वादामुळे होत असलेले निकृष्ट दर्जाचे कामे, अधिकारी व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणाचे परिणाम सर्वसामान्यांना भेगावे लागत असतात. मिरारोडच्या शितल नगर परिसरात चेंबरवर झाकण बसवल्यामुळे एका ३७ वर्षीय व्यक्तीचा सन्मान हॉटेलजवळ असणाऱ्या नाल्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठेकेदार व संबंधित विभागाचा अधिकारी मृत्यूला जबाबदार धरून यांच्यावर मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात विकासात्मक कामे करणे कामी निविदा काढून वेगवेगळ्या कंपन्यानां ठेका देऊन कामे केली जातात अर्धवट केलेली कामे नागरिकांना नेहमीच त्रासदायक ठरलेली आहेत. याचाच परिणाम म्हणून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. मिरारोड येथील शीतल नगर भागात सन्मान हॉटेल जवळ शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान फुटपाथवरून जात असताना एक व्यक्ती अचानक नाल्यात पडला. त्यावेळी तिथे असलेल्या स्थानिक नागरिकांनी एक व्यक्ती नाल्यात पडल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला नाल्यातून बाहेर काढले काढल्यानंतर नाका तोंडात पाणी गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. हा व्यक्ती व्यवसायाने पेंटिंग काम करत असल्याचे माहिती मिळते आहे.शहरातील जनतेसाठी नागरीसुविधा देण्यासाठी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते, नाले, गटारे , पाणी, लाईट पुरवण्यात येते त्यासाठी नविन कामे, दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी ठेकापद्धतीने हे काम करून घेतले जाते. ठेकेदाराकडून काम करताना निकृष्ट दर्जाची व काही ठिकाणी अर्धवट करत असल्याचे दिसून येते या बाबत अनेक तक्रारी मनपात येत असतात गटारावर असलेल्या चेंबरवर निकृष्ट दर्जाची झाकणे टाकली जातात. गटाराचे काम झाले की काही दिवसातच ही झाकणे तुटलेली पाहायला मिळतात.
झाकणे तुटल्यानंतर पादचाऱ्यांना फुटपाथवरून
चालने धोक्याचे बनते. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी रस्त्यावरील पथदिवेही बंद असतात त्यामुळे फुटपाथवर अंधार असतो जिथे चेंबर चे झाकण आहे की नाही हे ही लक्षात येत नाही. त्यामुळे तेथून जाणारी व्यक्ती गटारात पडते त्यातच त्याचा मृत्यू होतो. मिरा भाईंदरमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. अधिकारी ठेकेदार मात्र मूग गिळून गप्प बसलेले असतात. जेवढा ठेकेदार आहे तेवढेच ठेकेदारांना पाठीशी घालनारे अधिकारीही जबाबदारआहेत. जर ठेकेदार आणि अधिकारी यांनी निष्काळजी केली नसती तर या मृत झालेल्या व्यक्तीला जीवणास मुकावे लागले नसते अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
खान यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यावर मिरारोड पोलिस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्यक्ती आपला उदरनिर्वाह कलर पेंटरचे काम करून करत होता.
या गटाराचे काम करणारा ठेकेदार याने आपल्या कामात निष्काळजी केली आणि बनवलेल्या चेंबरवर ढक्कन न बसवतात उघडे ठेवले होते. अधिकारी हेही तेवढेच याला जबाबदार आहेत असे मृत व्यक्तीच्या भावाने म्हटले आहे.
मिरारोड पोलीस ठाण्यात भारतिय दंड संहिता १८६० कलम ३०४, ३४ प्रमाणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिरा रोड पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.