महिलेने चिठ्ठी लिहून स्वतःला लावून घेतला गळफास

महिलेने चिठ्ठी लिहून स्वतःला लावून घेतला गळफास



मिरा-भाईंदर मधिल काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले लोढा कॉम्प्लेक्स जवळील एम एम आरडीय च्या इमारतीत आठराव्या मजल्यावर १८०२ मध्ये राहणाऱ्या महिलेला मानसिक त्रास सहन न झाल्याने चिठ्ठी लिहून स्वतःला गळफास लावून घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


 


काशिमीरा पोलिस ठाण्याच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाकूर मॉल समोरील 


एम एम आरडीय च्या इमारतीत राहत असलेल्या अनुपमा दुर्गानंद पाठक वय वर्षे ४० नामक महिलेने तिच्या ओळखीच्या व्यक्तीकडून झालेला मानसिक त्रास व विजडम प्रॉड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीच्या अधिकारीऱ्याने दिलेला मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे स्वतःला ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन २९ ते २ ऑगस्ट मध्ये घडला असल्याची नोंद करण्यात आली असून या प्रकरणी ३ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर महिलेने गळफास लावून घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्यानुसार त्या मृत महिलेने दोन व्यक्तीला आत्महत्येस जबाबदार धरले आहे. ही महिला गावी जाण्यापूर्वी आरोपीने त्या महिलेची ऍक्टिव्हा नावाची दुचाकी मागून घेतली होती ती या महिलेने दिली पण गावावरून परत आल्यानंतर महिलेला दुचाकीची आवश्यकता भासू लागली तेव्हा तिने आरोपी कडून दुचाकी परत मागण्यासाठी अनेकवेळा विनंती केली पण आरोपीने परत केली नाही. वारंवार फोन करून एस एम एस केले व्हाट्सएपच्या माध्यमातून चॅटिंग, व्हॉइस संदेश पाठवून विनंती करून देखिल दुचाकी परत न करता उलट तिला मानसिक त्रास दिला तर विजडम प्रॉड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये मृत महिलेने दुसरीकडून घेऊन काही पैसे गुंतवले होते. गुंतवणुकीची मुदत संपूनही सदर मृतक महिलेला पैसे परत न करता मानसिक त्रास दिला जात होता या मानसिक त्रासाला कंटाळून अनुपमा पाठक या महिलेने आत्महत्या केली आहे असे तिने लिहिलेल्या चिठ्ठीत आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळत आहे. 


सकाळच्या वेळी या इमारतीत सकाळच्या वेळी पाणी सोडले जाते पाणी भरण्यासाठी शेजारी एकमेकांना झोपेत असेल तर उठवत असतात तेव्हां शेजारच्या मंडळींनी या महिलेला पाणी भरण्यासाठी पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा ही वाजवला पण दार उघडले गेले नाही तेव्हा शेजाऱ्यांना सवंशय आला काहीतरी अनुचित प्रकार घडला असावा असे लक्षात आले. या घटनेची खबर पोलिसांना मिळताच तात्काळ पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. काशिमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी घटनास्थळाला भेट दिली पाहणी केली पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मदतीने दार उघडण्यात आले. तेव्हा एक महिला पंख्याला ओढणीने बांधून गळफास घेतलेली लटकताना आढळून आली  सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला त्या फाशी लावून घेण्यापूर्वी चिट्टी लिहून ठेवलेली मिळून अली पंचनामा झाल्यानंतर बॉडी पोस्टमार्टेमसाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात भाईंदर पश्चिम येथे पाठवण्यात आली. 


या महिलेणे स्वतः चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्यात तिने आत्महत्या का करत आहे. या आत्महत्या कोणाच्या त्रासामुळे करावी लागत आहे हे लिहिले आहे. त्यानुसार काशिमीरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. गु.र.नं.T ६२६/२०२० भारतीय दंड संहिता १८६० कलम ३०६ प्रमाणे नोंद केला असून यातिल दोन आरोपी, मनीष झा व विजडम प्रॉड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीसंबंधित अधिकारी या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांना आतापर्यंत आरोपी फरार आहेत अजूनपर्यंत सापडलेले नाहीत असे तपास अधिकारी पीएसआय चंदनकर यांनी सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलीसांनी केलेल्या पाहणी नुसार घरात शोध घेतला मात्र कुठल्याही प्रकारचे संशयास्पद असे काही मिळून आले नाही. अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. या गुन्ह्याचा पोलिस तपास करत आहे.