मिरा-भाईंदर मधिल कोरोनाबाधितांचा आकडा साडेनऊ हजारांच्या पुढे, बळीच्या संख्येचा आकडा तीनशे पार 

मिरा-भाईंदर मधिल कोरोनाबाधितांचा आकडा साडेनऊ हजारांच्या पुढे, बळीच्या संख्येचा आकडा तीनशे पार 


 



कोरोनाच्या दहशतीखाली जगणारा शहरातील नागरिक हाताचा रोजगार गेल्याने हवालदिल झाला आहे. जगावे कसे ? हा प्रश्न त्याच्या समोर उपस्थित झाला असून शहरातला कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारला सरकारला हवे तेवढे यश मिळालेले मात्र दिसून येत नाही त्यामुळेच मिरा-भाईंदर शहरात कोरोना रुग्ण संख्या साडे नऊ हजाराच्या पुढे गेला आहे तर आता पर्यंत कोरोनाचे बळी ठरलेली संख्या तीनशे पार झाली आहे.तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण पण चांगले आहे.


 


मुंबई लगत असलेल्या मिरा-भाईंदर मनपा सारख्या शहराला कोरोना साथीने ही हवालदिल केले. अनेकांच्या हातातली रोजीरोटी हिसकावून घेतली. फूटपाथवर छोटे छोटे व्यवसाय करून आपला प्रपंच चालवणारा समुदाय आज संपूर्ण पणे हवालदिल झाला आहे. दररोजच्या दोनवेळच्या जेवणासाठी दिवसभर राबराब राबणारे हात आज थांबल्यामुळे खायचे काय हा जीवनमरणाचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. शहरातला कोरोनाचा प्रभाव कमी कधी होणार आणि जनजीवन सुरळीत चालू कधी होणार याची चिंता दररोज सतावत आहे. दिवसेदिवस रुग्ण वाढत आहेत शहरातील वाढती रुग्ण संख्या ही दहा हजाराच्या जवळ गेलेली आहे तर सव्वा चार महिन्यात तीनशे पेक्षा अधिक नागरिकांचे कोरोनाने बळी घेतले आहेत. आजच्या दिवशी शहरात रुग्ण- १६४ मिळून आले आहे तर एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे आणि १५२ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.


मिरा-भाईंदर शहरातील एकूण रुग्णांचा हा ९५८३ पोहचला आहे लवकरच दहा हजाराचा पल्ला पार करणार आहे. तर कोरोनावर मात करून बरे झाले रुग्ण हे ७७६८ एवढे असून शहरात आतापर्यंत कोरोनाने ३१३ जनांचा बळी घेतला आहे. सध्या शहरात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही १५०२ आहे.