धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे नाल्यात वाहून जाणारे घरचे सामान वाचायला गेलेल्या तिघापैकी एक जण बुडाला तर दोघांना स्थानिकांनी वाचवले

धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे नाल्यात वाहून जाणारे घरचे सामान वाचायला गेलेल्या तिघापैकी एक जण बुडाला तर दोघांना स्थानिकांनी वाचवले


 


वादळ वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने मिराभाईंदरकरांचे घरगुती सामान, वाहने, याचे मोठे नुकसान, गाय, म्हैस, शेळी पाळीव प्राणी पुराच्या पाण्यात गेले वाहून, नाल्याच्या पाण्याच्या वाहून जाणाऱ्या दोघांना स्थानिकांनी वाचवले तर एकाच बुडून मृत्यू.


 


मुंबईसह मिरा-भाईंदर शहरात जून मध्ये पावसाने सुरवात केली पण तब्बलदीड महिना उसंती घेतलेल्या पावसाने जोरदार चार ऑगस्ट पासून जोरदार हजेरी लावली वादळी वारा, ढगांच्या गडगडाट व विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील अनेक इमारतीच्या तळमजल्यातील असलेल्या घरांमध्ये, बैठया चाळी, गावं, वस्त्यांमध्ये मोठयाप्रमानत पाणि शिरले त्यामुळे आर्थिक नुकसान मोठया प्रमाणात झाले आहे. काशिमीरा गावठण येथील एकाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश मिळाले आहे.


 


 


मीरा भाईंदर परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे परिसरातील नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. यात मीरा गावठाण येथील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या नाल्यात पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला आहे.


मीरा भाईंदर शहरात दोन दिवसापासून जोरदारपणे पाऊस कोसळत आहे. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळें शहराची परस्थिती जलमय बनली त्याचबरोबर छोटे, मोठे नाले तुडुंबभरुन वाहू लागले नाल्याचे पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरले अनेक वाहने पाण्याखाली गेली. काही दुचाकी, तीनचाकी,व चारचाकी वाहने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली असताना काहींनी आपली वाहने वाचवली काशी मीरा परिसरातील मीरा गावठाण गावदेवी मंदिरा लागत असलेल्या नाल्यामध्ये वाहून जात असलेल्या आपल्या दुचाकीला समानाला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या तिन व्यक्ती पैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन जणांना वाचवण्यात यश आले. पोलीस व अग्नीशमन दलाच्या जवानांची त्याचा मृतदेह नाल्यातून काढून शवविच्छेदनासाठी पंडित भीमसेिन जोशी रुग्णालयात पाठवले आहे.


 


स्थानिकांनी ठेकेदार व मनपा अधिकाऱ्यांवर लावले आरोप 


 


स्थानिक नागरिकांनी मात्र नाल्याची भिंत पाण्याने वाहून गेली आहे त्यामुळे व नाला ओहरफ्लो झाल्याने परिसरात पावसाचे पाणी शिरले. त्यात अनेकांचे सामान वाहून गेले दुचाकी वाचवण्यासाठी, सामान वाचवण्यासाठी गेलेले तीन जण प्रहवाचा सोबत खेचले गेले स्थानिकांनी दोन जणांचे जीव वाचवले पण एकाला मात्र जीवनाला मुकावे लागले स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नाल्याच्या भिंतीचे काम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. त्याकडे मनपा अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. निष्काळजीपणा केल्यामुळेच आज एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. असा आरोप करण्यात येत आहेत.


मीरा भाईंदर शहरात मंगळवार पासून सुरवात झाली तर मध्यरात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील मुख्य मार्ग तसेच सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मिरारोडमधील प्लेजेंट पार्क, सिल्वर पार्क, विजय पार्क, शीतल नगर, शांती नगर,नया नगर पूजा नगर, सृष्टी, मिरा गावं ,मुन्शी कंपाउंड, सिल्वर सरिता, साईबाबा नगर, काशी गावं , साईकृपा कॉम्प्लेक्स, ग्रीन व्हिलेज, मिनाक्षी नगर ,डाचकूल पाडा, लक्ष्मी बाग, हाटकेश, घोडबंदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. त्यामूळे घरउपयोगी सामानामचे मोठे नुकसान झाले तर भाईंदर पूर्व भागात बीपी रोड, नवघर रोड, केबिन रोड व भाईंदर पश्चिम येथील बेकरी गल्ली, जे पी ठाकूरमार्ग उत्तन परिसरात देखील पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन घेऊन किंवा पायी चालणेही कठीण झाले होते. पालिका अधिकाऱ्यांनी केलेला शंभर टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे शहरातील अनेक ठिकाणी नाले तुडुंब भरुन वाहू लागले तर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे.  


 


 काँग्रेस चे सत्ताधारी भाजपा विरोधात आंदोलन 


 


युवक काँग्रसचेकडून मात्र सत्ताधाऱ्यांचा उलट्या कमळाचे चित्र वाहत्या पाण्यात धरून निषेध नोंदवला आहे मीरा भाईंदर युवक काँग्रेसने ज्या परिसरात पाणी साचले आहे. त्याठिकाणी जाऊन सत्ताधारी भाजपचा निषेध व्यक्त केला.सत्ताधारी भाजपचा नियोजन शून्य शहरात कारभार सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी जनहीताची जी कामे आहेत त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भभवते आहे. , अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे युवक अध्यक्ष दीप काकडे यांनी व्यक्त केली आहे.