मनपाच्या अत्यावश्यक सेवेतले ५३ कर्मचारी आढळले कोरोना बाधित


 


कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. या संकट काळात ही सेवा देणारी मंडळी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावत आहेत देशात , राज्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. तिच परस्थिती मिरा- भाईंदर शहराची आहे कोरोना बधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मनपात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली त्यापैकी ५३ कर्मचारी कोरोनाने बाधित झाल्याचे समोर आले आहे. 


 


मीरा-भाईंदर मनपा क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचारीवर्ग आपली सेवा बजावत आहे त्यांच्या आरोग्याची काळजी मनपाकडून घेण्यात येत असल्यामुळे शहरातील सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोविड-१९ ची अँटिजेन तपासणी करण्यात आली. मनपात ठेका पद्धतीने कार्यरत असलेल्या १ हजार ५९९ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा या पैकी ५३ जणांना लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे या साथीच्या काळात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्या बरोबर इतर ही कर्मचाऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यामध्ये चालक, सफाई कामगार, मुकादम, अशा एकूण ५३ कामगाराचां समावेश आहे. यात काही कर्मचाऱ्यामध्ये लक्षणे जाणवत नसली तरीही चाचणीमध्ये संक्रमित आढळून आले आहेत. काहींना नगण्य असे लक्षणे दिसून येतात, त्यांच्याकडुन संसर्गफैलाव होऊ नये या कोरोना साथीला आळा घालण्यासाठी ही काळजी घेतली गेली आहे या सर्व कर्मचाऱ्यांना मिरारोडच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 


मनपातील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अनेक अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाने संक्रमित झाले होते.त्यातील अनेक कर्मचारी कोरोनावर मात करत आजही आपली सेवा बजावत आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली आहे. कोरोनाला घाबरून न जाता काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संसर्ग थांबवण्यात यश मिळेल असेही अनेक जाणकारांना वाटत आहे.