पोलिस हवालदार पंडित यांना मा. पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान
पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर उत्कृष्ट अशी कामगिरी करून क्लिस्ट असलेल्या गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांना सजा मिळवून देण्या कामी अचूक कर्तव्य पार पडणाऱ्या पोलिस हवालदार पंडित यांना माननीय पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या अस्थापनेवर कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर 22 77 मच्छिंद्र बाबुराव पंडित हे दिनांक 9 /11/ 1992 रोजी पोलीस शिपाई या पदावर भरती झालेले आहेत. पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पोलिस मुख्यालय ठाणे ग्रामीण मधील भाईंदर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा,उत्तंन सागरी पोलीस ठाणे येथे उत्तम रित्या कर्तव्य बजावले आहे पोलीस हवलदार 2277 मच्छिंद्र बाबुराव पंडित यांनी आपल्या 28 वर्षाच्या सेवाकाळात विविध पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे येथे कार्यरत असताना, वेगवेगळ्या क्लिस्ट असलेली गुन्ह्यांची उकल , मोठमोठे गंभीर गुन्हे, मोठ्या शिताफीने व कौशल्याने उघडकीस आणले आहेत. तसेच त्या गुन्ह्यातील आरोपी यांच्याविरुद्ध पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केली आहेत. त्यांनी तयार केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यातील बऱ्याच आरोपींना शिक्षा झाली आहे त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरी बाबत त्यांना वरिष्ठांनी बक्षिसे देऊन गौरविले आहे. त्यांच्या सेवाकाळात आता पर्यंत 299 बक्षिशे त्यांचे सेवा पटावर नोंद आहेत. त्याची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह मिळवण्यासाठी ठाणे ग्रामीण माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी राठोड यांनी माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता त्या अनुषंगाने एक मार्च 2020 रोजी पोलीस हवलदार मच्छिंद्र पंडित यांना माननीय पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. 15 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर पोलीस हवालदार मच्छिंद्र पंडित यांना ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी राठोड यांच्या हस्ते मा. पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.