एसीबीने लाचखोर तालाठ्याला पकडले रंगेहात
मुंबई ही मायानगरी म्हणून ओळखली जाते या माया नगरीमध्ये प्रत्येकजण मोठी स्वप्न घेऊन जगत असतो झटपट श्रीमंत होण्याच्या स्वप्नात प्रत्येक जण गुरफटलेला आहे पैशामुळे सगळं काही मिळतं या भ्रामक भावनेत जगत असलेला माणूस आणि त्याची वाढत गेलेली लालसा त्याला कोणत्याही थराला घेऊन जातो मनाला लागलेली पैशाची चटक ही त्याला काळा कमाई कडे ओढत नेते पण प्रत्येकाला काळी कमाई पचतेच असे नाही अनेकजण काळी कमाई करण्याच्या माया जाळ्यात बेधुंद होऊन अडकलेले असतात ते अखेर अलगद ए सी बी च्या जाळ्यात अडकतात असाच काळ्या कामाईच्या नादात डुबलेला मिरा-भाईंदर मधिल तलाठी अखेर ए सी बी च्या जाळ्यात अडकला.
मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात भाईंदर पश्चिम मध्ये मौजे उत्तण विभागात कार्यरत असलेला तलाठी उत्तरा उत्तमराव शेडगे हा दलाल समीर मुजावर यांच्या माध्यमातून संगनमताने अनेकांच्या जमिनीचे फेरफार हेराफेरी करून बेकायदेशीर मार्गाने काळी कमाई कमवत होता. अनेक जमिनीची प्रकरणे प्रलंबित ठेवून ते पूर्ण करण्यासाठी काळी कमाई दलालांच्या माध्यमातून कमावण्याचे मनसुबे रचून गडगंज संपत्ती कमावण्याच्या नादात अखेर या भ्रष्ट तालाठ्याला गजाआड जावे लागले. उत्तन येथील स्थानिक रहिवाशी मोहम्मद आश्रम यांच्या जमिनीचा फेरफार चे काम तलाठी शेडगे यांनी लटकवत ठेवले होते हे काम पूर्ण करण्यासाठी दलाल समीर मुजावर यांना मध्यस्थी टाकून मोहम्मद अश्रफ यांचे काम करण्यासाठी ६५ हजाराची लाच मागितली होती. लाचेचा पहिला हप्ता २०,०००/- रुपये ठरला होता. पैशाच्या नशेत तर्र झालेल्या तलाठ्याची तक्रार मोहम्मद अशरफ यांनी एसीबी कडे केली त्यानुसार या लाचखोर असलेल्या तलाठ्यावर सापळा लावला आणि २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हा लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला. उत्तण हा परिसर निसर्गरम्य असलेला परिसर आहे. विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून या परिसराला मान्यता मिळाली आहे. येथील जमिनीचे भाव सोन्याच्या भावाप्रमाणे गडगडलेले आहेत. त्यामुळे या भागात जमिनीच्या मालकीबाबत मोठ्या हेराफेरी केल्या जातात दलाला मध्ये टाकून हा तलाठी बेकायदेशीर पणे मोठी हेराफेरी करण्याचे काम करत असतो असे स्थानिक नागरिक बोलत आहेत. बेकायदेशीर पणे हेराफेरी करणारा तलाठी शेडगे स्थानिक भूमिपुत्रांच्या मालकी जमिनी पैशाच्या लालचे पोटी पैसेवाल्यांचा घशात घालत होता या भ्रष्ट कारभाराला येथील काही राजकारण्यांचा छुपा पाठिंबा लाभलेला आहे अशी स्थनिक नागरिकांच्या चर्चेतून माहिती ऐकायला मिळते तर मंडळाधिकारी आणि तहसीलदार यांच्या आशीर्वादाने हा गोरख धंदा हा तलाठी वर्ग करत असतो असे स्थानिक आरोप करत आहेत. यांची चौकशी होणे तेवढेच गरजेचे आहे अशी मागणी स्थानिक यातून समोर येत आहे त्यामुळे महसूल विभागाचा कारभार भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला आहे असे चित्र दिसते आहे आता हे पहावे लागणार आहे एसीबी ने त्या तलाठ्याला तर गजाआड केले पण तलाठ्यावर आशीर्वाद ठेवणारे मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांची चौकशी करणार काय ? भ्रष्ट कारभाराची चिरफाड होणार काय ? हे मात्र भविष्यकाळत पाहावे लागणार आहे.