नातेसंबंध बिघडू देऊ नका कोरोनाची भीती मनातून काढा
मानवता हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि नाते संबंध हे सामाजिक संरचनेतले मोठे घटक आहेत म्हणून नातेसंबंध टिकले पाहिजेत कोरोनाच्या भीतीमुळे नातेसंबंधावर परिणाम होत आहे. जिवाभावाचे नाते, आई-मुलाचे नातेही दुर गेले आहे. साथीचे रोग येतात आणि जातात, कोरोना झाला आणि जीव गेला असा काही आजार नाही तो बरा होतो त्यामुळे नाती तोडू नये अशे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
, आईशी असलेली नाळ तोडण्याची आपली संस्कृती नाही. कोरोनाची भीती बाळगू नका व कुणालाही वाळीत टाकण्याची मानसिकता ठेऊ नका. नात्यातील प्रेम-जिव्हाळा कमी होऊ देऊ नका, असे
सध्या संपूर्ण देशात कोरोनाची भीती वाढलेली दिसत आहे याचं भीतीपोटी सगळ्याच नाते संबंधांवर विपरीत परिणाम होतांना दिसत आहेत. पनवेलमध्ये घडलेल्या घटनेवरून, भीती किती भरलेली आहे हे कळून चुकते आहे. आईला कोरोनाची लागण झाली होती, ती उपचार घेऊन ठीक झाली. ती बरी झाल्यानंतर तिला घरी घेऊन जायची तिच्या मुलाला भीती वाटायला लागली. त्याला वाटले, आईमुळे मला व घरातील इतरांना प्रादुर्भाव होईल. असे त्याला वाटू लागले. संक्रमित झालेल्या रुग्णांशी वाळीत टाकल्यासारखे वर्तणूक करू नका’, हा आजार बरा होतो, असे टोपे म्हणाले.
कोरोनाची लागण झालेल्यामध्ये उपचारानंतर ठीक झालेल्यांमध्ये किमान 5000 रुग्ण असे आहेत ज्यांचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. 90 वर्षे वयापुढील जवळजवळ 600 लोक बरे झाले आहेत. कोरोनाची लागण झालेले व्यक्ती 10-12 दिवसांमध्ये या आजारातून बाहेर पडू शकतात.
कोणतीही साथ म्हटले की तिचा संसर्गाचे प्रमाण असते तोच गुणधर्म हा कोरोनाचा आहे. परंतु कोरोनाची तीन स्वरूप आहेत सौम्य, मध्यम आणि गंभीर. सौम्य स्वरूपासाठी 10 दिवस कोरोना काळजी केंद्रात राहून लक्षणांवर आधारित उपचार देऊन त्यांची फक्त प्रतिकारशक्ती वाढवतो.
उर्वरित 15 टक्के लोकांना लक्षणे असतात. ताप, सर्दी, खोकला असतो, काही जनाणा कोणतीही चव लागत नाही, जेवण हे बेचव लागते काही जणांचे जेवन कमी होते तर काहींना जेवावेसे वाटत नाही. मोजकेच म्हणजे 2-3 टक्के रुग्ण गंभीर असतात, त्यामुळे मनातून भीती काढून टाकली पाहिजे आणि नातेसंबंध जपले पाहिजेत असे ना. टोपे हे म्हणाले .