मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले तिथेच झाला तिचा विश्वासघात,  पोलिसांनी ठोकल्या बेड्या बलात्कार करणाऱ्याच्या हातात


 


 अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे जाळे पसरवून तिला दुपारच्या वेळी भेटण्यासाठी बोलावून तिचा विश्वासघात करत आरोपीने त्याच्या मित्राच्या मदतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना भाईंदर पूर्व भागातील नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे या मुळे या परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरनातील आरोपींना नवघर पोलिसांनी आरोपी व त्याच्या मित्राला पोलिसी बेड्या ठोकल्या आहेत.


 


अस म्हटलं जात की, मैत्रीसाठी, प्रेमासाठी जात,धर्म,पंथ,वय हे बंधने कधीच आडवे येऊ शकत नाहीत. कधी कुठे कशी मैत्री होईल व कधी कोण कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच काहीशी परिस्थिती असलेली एक घटना भाईंदर पूर्व भागात घडली आहे. अल्पवयीन पीडितेची व आरोपीची एका नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत व मैत्रीचे रूपांतर प्रेमात घडले तिथेच तिला तिचे आयुष्य नडले ज्याच्यावर विश्वास ठेवून प्रेम केले त्यांनीच तिच्या अब्रूची लक्तरे तोडली अल्पवयात लागलेलं हे प्रेमाचे वेड अखेर तिच्या आयुष्याला कलंकित करून जाणारे ठरले. भाईंदर पूर्वेला राहणाऱ्या एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला बलात्काराची शिकार बनावे लागले. मैत्रीचा,तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेत मुख्य आरोपी यश याने तिला दुपारच्या वेळी बोलावून घेतले तिला चार चाकी वाहनात बसवून आपल्या साथीदारासह तो भाईंदर पूर्वेला असलेल्या लल्लनं तिवारी कॉलेज रोडवर घेऊन गेला आणि दुपारची वेळ असल्याने वाहतुकीची वर्दळ ना च्या बराबर असल्यामुळे त्यानें या संधीचा फायदा घेत थेट तिच्या अब्रूवरच हात घातला आणि त्या कोवळ्या जीवावर लैंगिक अत्याचार केले.  


 


मैत्रीवर प्रेमावर विश्वास ठेवून आलेली पीडितेच्या विश्वासघात करणारा सवंशयीत असलेला आरोपी आणि त्याचा मित्र यांनी हा संगनमताने कट रचून तिची अब्रू लुटली असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. हे कांड घडत असताना मुख्य आरोपीचा मित्र हा रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांवर नजर ठेवून होता. तर मुख्य आरोपी हा पीडितेच्या अब्रूचे लचके तोडत होता. पीडितेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी पोलिसांना सांगितली आणि पीडितेच्या सांगण्यानुसार भाईंदर पूर्व येथील नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात अशीही चर्चा आहे की, या गुन्ह्यातील आरोपी हा एका राजकीय व्यक्तीचा पुतण्या असल्यामुळे या आरोपींवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणला जात होता. पोलिस या दबावाला बळी पडलेले दिसून आलेले नाहीत हे ही तेवढेच खरे आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी प्रामाणिकपणे केला तर अशा आरोपींना कायदा नक्कीच सजा देईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


पीडितेवर झालेल्या अत्याचाराची तक्रार प्राप्त होताच नवघर पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक करून त्यांना गजाआड केले आहे. त्याचबरोबर आरोपींवर बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा म्हणजे "बाल संरक्षण अधिनियम २०१२" नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.के.पोटे करत आहेत.