माजी आमदार नरेंद्र मेहतावर गुन्हा दाखल
मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र हे नेहमीच या ना त्या कारणाने वादग्रस्त राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी लैंगिक शोषण केल्याचे आरोप करत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये भाजपा नगरसेविकेने गुन्हा दाखल केला होता ते प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत दुसरे प्रकरण समोर उभे राहिले आहे. मेहता यांच्यावर जमिनीवर बेकायदा कब्जा करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात हा गुन्हा करण्यात आला आहे.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर काही महिन्यांपूर्वी वरसावे येथील सरकारी तलाव बुजवल्याचा वाद निर्माण झाला होता त्यात स्थानिकांनी नरेंद्र मेहता यांच्यावर आरोप केले होते, भाजपा नगरसेविकेने वेगवेगळे आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत दुसरे प्रकरणाने तोंड उघडले आहे. 2 ऑगस्ट रोज मंगळवारी जमीन कब्जा करत असल्याची तक्रार मेहता व त्यांच्या साथीदारांविरोधात पोलिसांत दाखल केली गेली आहे.
भाईंदर पश्चिम येथील तोदी
वाडी येथील जमीनीचा वाद उफाळून आला याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस त्या ठिकाणी पोहचले, पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्त त्या ठिकाणी दिसून आला या प्रकरणात मिरा-भाईंदरच्या सत्तेची सूत्रे आजही पडद्यामागून हालाविनारे भाजपा माजी आमदार व त्यांच्या काही साथीदारांनी जबरदस्ती करत कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असे आरोप तक्रारदार यांनी लावले आहेत. त्यामुळे हा जमीनीचा वाद वाढला असून जमीन मालक श्यामसुंदर अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकाने नरेंद्र मेहता आणि त्यांच्या साथीदारां विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. श्यामसुंदर अग्रवाल यांच्या मालकीच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी नरेंद्र मेहता हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन आले. त्यांनी त्या जमीन परिसरात लावलेले पोस्टर फाडले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या जागेच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकाला शिविगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच त्यांनी जमीन खाली करा, येथून निघून जा तुमचा मालकाला बोलवं ही जमीन आम्हाला लिहून देण्यासाठी सांग नाहीतर ठार मारू असी धमकी दिली आहे, असे अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. नरेंद्र मेहता यांच्या सह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन मालक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती प्रशांत केळुसकर आणि मेहतांचे यांचे निकटवर्तीय संजय थरथरे यांच्यासह इतर 35-40 जणांविरोधात भाईंदर पश्चिम पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 प्रमाणे 188,269,270,271, 143,174,149, 323,427,447,504,506 कलमान्वये तर महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 135,37,प्रमाणे व साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 2,3,4 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51( b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भाईंदर पोलीस करत आहेत.