*चारकोप कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार समीर पवार यांचे कोरोना मुळे निधन*
चारकोप पोलीस ठाणे येथे नेमणूकीस असलेले पो.ह.क्र. 33792/समीर हरीशचंद्र पवार, वय 45 वर्षे,यांनी दि.6/08/20 रोजी कोविड तज्ञ आजाराची अँटिजेंट टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पोजिटिव्ह आला असल्याने त्यांना ऑस्कर हॉस्पिटल चारकोप कांदिवली येथे दाखल करण्यात आले होते.ऑस्कर हॉस्पिटल येथे त्यांच्या साॅबची तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून त्यांच्या ऑक्सिजनची लेवल ढासळल्याने त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने सेव्हन हिल हॉस्पिटल मरोळ येथे दिनांक 19/08/20 रोजी अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. सेव्हन हिल्स रूग्णालयात त्यांचे दि.27/08/20 रोजी रात्रौ09.30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने कांदिवलीच्या मोठ्या मित्र परिवाराने आणि नातेवाईकांनी हळ हळ व्यक्त केली आहे . शहीद पोलीस हवालदार समीर पवार यांना समाजातील सर्व स्तरातील लोकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली . तसेच चारकोप मार्ग कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी शहीद पोलीस हवालदार समीर पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली .