गडचिंचले प्रकरणावर कोकण विभाग पोलीस महानिरीक्षक यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर केली कारवाई

गडचिंचले प्रकरणावर कोकण विभाग पोलीस महानिरीक्षक यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर केली कारवाई


 



पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले गडचिंचले येथे मुले पालवणारी टोळी समजून जमावाने केलेला साधू वेशात असलेल्या व्यक्तीवर जमावानें केलेल्या हल्ला प्रकरणी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी अशा अठरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.


 


पालघर जिल्ह्यातील कासा विभागात मुले पळवणारी टोळी आली आहे आणि ती टोळी कोणतेही वेष धारण करून येते अशी अफवा पसरली होती त्याच काळात गुजरातकडे जाणारे दोन साधू वेशात असलेले दोन व्यक्ती सह त्यांच्या वाहनाचा चालक हे लॉकडाउन मुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश करण्यास मनाई केली होती त्यामुळे ते मधला मार्ग शोधून कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गडचिंचले गावातून जात असताना त्यांनच्यावर त्या गावातील जमावाने मुले पालवणारी टोळी समजून हल्ला केला होता या केलेल्या हल्लाझालेला घडलेल्या जमावाने अमानुषपणे केलेल्या मारहाणीत दोन साधू वेशात असलेल्या व्यक्तींची व त्यांच्या गाडीचा चालक यांचा मृत्यू झाल्याची घटना १६ मे रोजी घडली होती. या प्रकरणाचे पडसाद हिंदुत्ववादी संघटनांने आंदोलने करत महाराष्ट्र सह देशभर उमटले होते. आता या प्रकरणी मोठी कारवाई करणयात आली असून कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलिस अधिकारी व कर्मचारी अशा एकूण १८ जणांवर गंभीर कारवाई करण्यात आली आहे. कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांनी कारवाई केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांना बडतर्फ करण्यात आले आहे तर सहाय्यक फौजदार रवी साळुंखे, नरेश धोडी यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात दोषी धरून उपनिरीक्षक सुधीर कटारे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना मूळ श्रेणीतील वेतनावर ठराविक कालावधी ठेवण्याच आदेश देण्यात आले आहेत. या सर्वांवर तीन व्यक्तींची हत्या होत असताना या अधिकारी आणि कर्मचारी यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणात तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवीन्य आले आहे तर कासा पोलिस स्टेशनमधील ३५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या कारवाई मुळें नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे तर पोलिस अधिकारी , कर्मचारी यांच्यात खळबळ उडाली आहे.