तिकीट काउंटर च्या कर्मचाऱ्याची दबंगगिरी थेट पत्रकारांना धमकी

  

तिकीट काउंटर च्या कर्मचाऱ्याची दबंगगिरी थेट पत्रकारांना धमकी

"सीधा करू क्या इसको" कर्मचारी छोटेलाल पांडे याचा व्हिडीओ व्हायरल 


विशेष प्रतिनिधी

मुंबईला वार्तांकन करण्याकरिता लोकलने जाण्यासाठी निघालेले  जोगेश्वरी परिसरात राहणारे वरिष्ठ पत्रकार सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष  संदीप कसालकर व मुंबई डेज वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक अरविंद बनसोडे यांना मुंबईतील अंधेरी पूर्व रेल्वे तिकीट काउंटर चा कर्मचारी छोटेलाल पांडे याने अर्वाच्य भाषेत बोलून "सीधा करू क्या इसको" असे धमकी देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


अंधेरी रेल्वेस्थानकावरून मुंबई कडे  दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२:५४ च्या दरम्यान जाण्यासाठी निघालेले वरिष्ठ पत्रकार तसेच सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्यासोबत मुंबई डेज वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक अरविंद बनसोडे हे वृत्तांकन करण्यासाठी चर्चगेट या परिसरात जाण्यासाठी अंधेरी पूर्व येथील  तिकीट काउंटर या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी गेले असता अंधेरी पूर्व तिकीट काउंटर या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी छोटेलाल पांडे यांना तिकिटासाठी विचारले असता त्याने "तुम्हाला परवाना नाही" असे म्हटले. या पूर्वी ३ दिवसांपूर्वी म्हणजेच १३ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ०६ वाजून ०९ मिनीटांनी अरविंद बनसोडे यांनी अंधेरी ते दादर हा प्रवास केला होता. या बाबत अरविंद बनसोडे सोबत प्रवास करणारे संदिप कसालकर यांनी एक पत्रकार म्हणून छोटेलाल पांडे यास "१३ नोव्हेंबर रोजी प्रवास केला मग आता का नाही" असे विचारपूस केली असता छोटेलाल पांडे याने संदिप कसालकर यांच्यासोबत अर्वाच्य भाषेत बोलून "इसको सीधा करू क्या" अशी धमकी दिली. दरम्यान संदिप कसालकर यांनी आम्ही पत्रकार आहोत, महत्वाचे वृत्तांकन करण्यासाठी जात आहोत अशी विनंती करून सुद्धा उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना अपमानित केले. संदिप कसालकर यांनी कोणत्याही प्रकारचे प्रतिउत्तर न करता ते शांत राहिले आणि पत्रकारांना अशी वागणूक देण्यात येत आहे याबाबत खंत व्यक्त केली. सदर घटना ही अत्यंत निंदनीय असून लवकरच याबाबत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांसोबत पत्रव्यवहार करण्यात येणार असून छोटेलाल पांडे यास त्याची चूक दाखवून देऊ असे संदिप कसालकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. हा विषय गांभीर्याने घेऊन अंधेरी पूर्व येथील कर्मचारी छोटेलाल पांडे यास तात्काळ निलंबित करून त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी सांगितले आहे.