मिरारोड च्या हाटकेश विभागात ‘स्पा’च्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय
मिरारोड मधिल हाटकेश विभागात जीसीसी क्लब जवळच असलेल्या सिटी कॉम्प्लेक्स नावाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर तोरोस स्पा मसाज पार्लर’ मध्ये स्पाच्या नावाखाली काही तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्या नुसार काशिमीरा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्पा सेंटरवर छापा टाकला आणि चार महिला व एक पुरुष यांना अटक केली आहे.
गेल्या काही दिवसापासून मिरा-भाईंदर शहरात मसाज च्या नावाखाली चालणारे गैरकारभार मोठया प्रमाणात बाहेर येत आहेत. बार, लॉजिंग, पाठोपाठ या शहरातले मसाज पार्लर या शहराला बदनाम करत आहेत. शहरात मसाज,स्पा सेंटर चे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे त्यामुळे शहरातले अनेक मसाज स्पा पार्लर वेश्यालये बनलेत की काय अशी शंका मनात निर्माण होत आहे. ज्या स्पा सेंटर वर पोलिसांचा छापा पाडतो तिथे तिथे पिटा दाखल होत आहे. याउघडया होत असलेल्या प्रकारामुळे असे वाटत आहे की शहराला या स्पा च्या आड चालणाऱ्या गोरखधंदयाचा विळखा तर पडला नाही ना असा प्रश्न पडला आहे. या शहरात जसे पोलिस आयुक्तालय जसे बनले आहे तसे मोठया प्रमाणात पोलिसाचे स्पा सेंटरवर धाड सत्र सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या धडीमुळे शहरात बोकाळलेली वेश्यावृत्ती बाहेर येत आहे. वेश्या व्यवसाय तेजीने वाढत आहे हे सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे याच विभागात काही दिवसांपूर्वी एका स्पा सेंटर वर पोलिसांनी छापा मारून काही मुलींची सुटका केली होती. मिरारोडच्या हाटकेश परिसरात जीसीसी क्लब च्या जवळच असलेल्या सिटी कॉम्प्लेक्स नावाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर तोरोस नावाच्या स्पा मसाजसेंटर च्या नावाखाली गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसायाचा गोरखधंदा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार काशिमीरा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि बोगस ग्राहक पाठवून शुक्रवारी सायंकाळी साडे चार च्या दरम्यान एका पुरुषाला अटक केली. त्याच्या तावडीतून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त यांच्या आदेशानुसार काशिमिरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. एपीआय गणेश भांबरे व त्यांचे सहकारी यांनी सापळा रचून ही यशस्वी पणे पार पाडली आहे पोलिस पीडित महिलांना महिलासुधार गृहात पाठवण्याची प्रकिर्या करत असून स्पा च्या मालकावर पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.