प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशासाठी दि. 26 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ

प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशासाठी दि. 26 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ

ठाणे :- महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशासाठी दि. 26 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.

      याबाबतच्या सर्व सुचनाप्रवेश पात्रता इत्यादी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या  www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध असेलयासाठी संबधितांनी वेळोवेळी संकेतस्थळ पहावेया नंतर ( D.El.Ed) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी असे  प्राचार्य,डॉ.भरत दा .पवार  जिल्हा शैक्षणिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था रहाटोली जि .ठाणे यांनी कळवले आहे.