विश्व समता कला मंचचे राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार विविध क्षेत्रातील 32 मान्यवरांना जाहीर

 विश्व समता कला मंचचे राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार विविध क्षेत्रातील 32 मान्यवरांना जाहीर


'मिशन जनकल्याण' चे संपादक राजेश जाधव यांना विश्व समता आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर


खेड (प्रतिनिधी): गेले अनेक वर्षा पासून विविध क्षेत्रात कार्यरत असलेली विश्व समता कला मंच लोवले, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मानित केले जाते. विश्व समता पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष असून सन 2021 मध्ये देण्यात येणार्‍या 32 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांची यादी प्रसिद्ध पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये साप्ताहिक ' मिशन जनकल्याण ' चे संपादक राजेश महादेव जाधव यांना राज्यस्तरीय विश्व समता आदर्श पत्रकार पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आला आहे. राजेश जाधव गेले 15 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान आहे. राज्यस्तरीय विश्वास समता पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता माध्यमिक शिक्षक पतपेढी हॉल, स्टेट बँक शाखे समोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे समता कला मंच चे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव यांनी दिले आहे. अधिक माहितीसाठी संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव यांना 8999494183 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

 विश्व समता पुरस्काराचे मानकरी :

 1) वैभव सदानंद खेडेकर (खेड), राज्यस्तरीय विश्व समता समाजरत्न पुरस्कार, 2) सुनील गोविंद जाधव (राजापूर) राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षक पुरस्कार, 3)भावना खोब्रागडे(चंद्रपूर) राज्यस्तरीय विश्व समता प्रेरणा पुरस्कार, 4) राजेश महादेव जाधव (मिरा भाईंदर, ठाणे) राज्यस्तरीय विश्व समता आदर्श पत्रकार पुरस्कार, 5) निलम विनायक गायकवाड (पुणे) राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षिका पुरस्कार, 6) विनोद जाधव (कुर्ला, मुंबई)राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण पुरस्कार, 7) अमोल रामचंद्र कदम (लांजा) राज्यस्तरीय विश्व समता कुलाभूषण पुरस्कार 8) सुरेश मोरे (खेड) राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण पुरस्कार, 9) दिलीप महिपत चव्हाण (चिपळूण) राज्यस्तरीय विश्व समता समाजरत्न पुरस्कार, 10) डॉ. अमित यादव (रत्नागिरी) राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण पुरस्कार, 11) प्रकाश लक्ष्मण झोरे (राजापूर) राज्यस्तरीय विश्व समता समाजरत्न पुरस्कार, 12) प्रकाश पवार (मुंबई) राज्यस्तरीय विश्व समता कलारत्न पुरस्कार, 13) अशोक धर्माजी पवार (दापोली) राज्यस्तरीय विश्व समता आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, 14) प्रमोद बळीराम जाधव (मंडणगड) राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षक पुरस्कार, 15) ऍड. संतोष देवजी सावंत (खेड) राज्यस्तरीय विश्वास समता समाजभूषण पुरस्कार, 16) रिया रूपेश पवार (दहिसर, मुंबई) राज्यस्तरीय विश्व समता प्रेरणा गौरव पुरस्कार 17) सूर्यकांत विष्णू सुतार (राजापूर) राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षक पुरस्कार, 18) प्रा. सुरेश कुराडे (सिंधुदुर्ग) राज्यस्तरीय विश्व समता समाजरत्न पुरस्कार, 19)चंद्रकांत शंकर शेंडे (रत्नागिरी) आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार चंद्रकांत शंकर शिंदे, 20) वैशाली विठ्ठल नलवडे (खेड) राज्यस्तरीय विश्वास समता प्रेरणा गौरव पुरस्कार, 21) संतोष पवार (संगमेश्वर) राज्यस्तरीय विश्वास समता कलारत्न पुरस्कार, 22) मुझाम्मिल मुस्ताक काझी (संगमेश्वर) राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार,

 23) शफिक हसन वाघू (राजापूर) राज्यस्तरीय विश्व समता आदर्श लिपिक पुरस्कार, 24) शाम गजानन पवार (जाकादेवी) राज्यस्तरीय विश्व समता कलारत्न पुरस्कार, 25)संतोष तुळशीराम घाडगे (मुंबई) राज्यस्तरीय विश्व समता कलाभूषण पुरस्कार, 26) पियुष  चंद्रकांत कारेकर (चिपळून) राज्यस्तरीय विश्व समता प्रेरणा गौरव पुरस्कार, 27) अनुराधा विवेक चव्हाण (संगमेश्वर) राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण पुरस्कार, 28) युवराज शंकर सुरळकर (जळगाव) राज्यस्तरीय विश्व समता साहित्यरत्न पुरस्कार, 29) दिपक सखाराम पवार (रत्नागिरी) राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण पुरस्कार, 30) डी. एम. कांबळे (कोल्हापूर) राज्यस्तरीय विश्व समता साहित्यराज पुरस्कार 31) सचिन जनार्दन  गमरे (खेड) राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षक पुरस्कार, 32) गुलाब मोहिनुद्दीन पालेकर (खेड) राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण पुरस्कार यांना सन 2021 चे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे.