रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेची कारवाईची तयारी
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात रस्ते, गटारे छोट्या छोट्या व्यावसायिकांनी व दुकानंदारांनी कब्जा केलेले दिसून येत आहेत. ना फेरीवाला क्षेत्रामध्ये व्यवसाय करणारे व्यापारी, विना परवाना व्यवसाय करणारे सर्व गॅरेजेस, सर्व्हिस सेंटर, कार वॉशिंग सेंटर, रस्त्यांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणारे गॅरेजेस, रस्त्यांवर व पदपथावर बेवारसपणे पार्किंग केलेली वाहने, पदपथावरील विक्रेते ज्यांनी दुकानाबाहेर पदपथावर विक्रीचा माल ठेवला आहे असे दुकानदार यांच्याबाबत महापालिकेकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा कडून मिळत आहे.
रस्ता,गटार,फुटपाथ कब्जाकरून आपले व्यवसाय करणारे छोटे मोठे व्यापारी आहेत या सुरू असलेल्या व्यावसायिकांच्या लावलेल्या धंद्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी अडथळे निर्माण झाले आहेत वयवृद्ध नागरिक, महिला, मुले यांना चालताना चक्क रस्त्यावरून जावे लागत असल्यामुळे जीवाला मुठीत धरून चालावे लागते कधीही वाहनांची धडक लागू शकते अनेक वेळा असे प्रकार घडत असतात त्यामुळे मिरा-भाईंदर शहरातून अनेक विभागातून तक्रारी वारंवार येत असल्याने मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी कठोर भूमिका घेत दि. 14/12/2020 रोजी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक बोलावून घेतली व महापालिका क्षेत्रातील सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करणेबाबत सूचना दिल्या आहेत. याबाबत दि. 21/12/2020 पासून कारवाई सुरू करण्यात येनार असल्याची माहिती मनपा कडून देण्यात आली आहे.
त्याच बरोबर रस्त्यांवर व फुटपाथवर बेवारसपणे पार्किंग केलेली वाहने, वाहन मालकांनी / चालकांनी, पदपथावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्याचे आवाहन उपायुक्त (अतिक्रमण) यांनी केले.
विना परवाना व्यवसाय करणाऱ्या सर्व गॅरेज, सर्व्हिस सेंटर,कार वॉशिंग सेंटरच्या व्यवसाय मालकांनी / चालकांनी त्वरीत महानगरपालिकेची नियमानुसार परवानगी घ्यावी अन्यथा अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांविरुध्द उचित कारवाई करण्यात येईल व त्याची जबाबदारी संबंधितांची असेल. तरी मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून रितसर परवाना घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. ही कारवाई किती यशस्वी होईल हे आता पाहावे लागणार आहे.