आईने रागावल्यामुळे मैत्रिणीसह निघून गेलेल्याअल्पवयीन मुलीचा पोलिसांनी अवघ्या पाच तासात घेतला शोध
मिरारोड पोलिस ठाण्यात एका महिलेच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्यात आली होती की, दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपासाचे चक्र हलवले आणि पाच तासात सदर प्रकरणाचा छडा लावला आणि दोन्ही अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
भारतात एकेकाळी एकत्र कुटुंब पद्धती नांदत होती तरीही तिथे एकमेकाला समजावून घेणे आणि गोडीगुलाबीने एकत्र राहणे हे मागील अनेक पिढ्यांनी पाहिले आहे. बदलत्या काळानुसार व नागरीकरणामुळे सध्या मात्र ही पद्धती लयास गेलीली दिसत आहे. कुटुंबातील छोट्या छोट्या विवादातून आजची तरुण पिढी कोणालाही कल्पना न देता घर सोडून जाणे, आत्महत्या करणे , तसा प्रयत्न करणे असे प्रकार वारंवार घडतांना पाहायला मिळत आहेत. आजच्या पिढीतील मुलांना थोडेही रागात बोलले की किंवा त्यांच्या इच्छे विरुद्ध बोललेकी त्यांना लगेच राग येतांना दिसत आहे. अशीच घटना मिरारोड मध्ये दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी मिरारोड मधिल शांती पार्क परिसरातिल महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, तिची १५ वर्षाची मुलगी व तिची मैत्रिण तिचे ही वय १५ वर्षे आहे या दोन मुलींचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला . अज्ञात इसमाने या दोन्ही मुलींचे अपहरण केले असल्याच्या संशय होता तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञाता विरुद्ध पोलिस ठाण्यात कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक प्रदीप संदीप कदम यांचे मार्गदर्शनात मीरारोड पोलीस तपास पथकाने गुन्ह्याचा तपास संवेदनशील व गांभीर्याने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहिती प्राप्त करून त्यांचा मिरारोड पूर्व भागात शोध घेऊन, अंधेरी जुहू बिच या भागात शोध घेऊन जुहू अंधेरी मुंबई येथून गुन्हा दाखल झाल्याच्या अवघ्या पाच तासात मुलींना शोधून सुरक्षित त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. तपासामध्ये समोर आले की, पीडित मुलीच्या आईने मुलीला रागावल्यामुळे घरी या कोणालाही काही एक न सांगता निघून गेल्या होत्या असे निष्पन्न झाले आहे. या घटने वरून आजच्या पिढीची मानसिकता बदललेली स्पष्टपणे दिसून येते ही मानसिकता बदलणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
सदरच्या गुन्ह्याची तपास कामी चोखपणे कर्तव्य बजावत उत्कृष्ठ कामगिरी पोलीस उपायुक्त मीरा-भाईंदर, सहाय्यक पोलीस आयुक्त , मिरारोड विभाग , पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलिस ठाण्याचे सपोनि तेजश्री शिंदे, सपोनि / शिवकुमार गायकवाड , पोवहा /आदक, पोलीस नायक सावंत, पोलीस शिपाई पारधी, पोलीस शिपाई केदार, महोम /निसाळ , महोम /भोये यांनी केले आहे