दोन सराईत चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मिरा-भाईंदर शहरात सोनसाखळी, असो या महिलांच्या गळ्यातील दागिने असो वेगवेगळी शक्कल लढवत चोरीच्या घटना घडल्या आहेत भाईंदर पूर्वेला राहणारी महिला फेरफटका मारण्यासाठी गेली असता तिला चोराने मी पोलीस आहे असे खोटे बोलून चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळून गेला होता. या घटनेची तक्रार सदर महिलेकडून दाखल करण्यात आली होती पोलिसांनी सतर्कपणे सापळा रचून दोन सराईत चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी पळून जाण्यासाठी पोलिसांच्या पथकावर हल्ला देखील केला.
भाईंदर पूर्व भागात राहणारी महिला ५ नोव्हेंबर रोजी फेरफटका मारण्यासाठी गेली असता महिलेला दोन चोरट्यांनी पोलीस भासवून थांबवले. मैं एक पुलिस हू, आगे एक औरत का मर्डर हुआ है. उसने गले में सोना पेहना था. उसका गला काट दिया है, असे चोरट्यांनी महिलेला सांगितले. तीच्या हातात एक पुडी देऊन महिलेच्या गळ्यातील १२ ग्रॅम सोनसाखळी खेचून पळून गेले होते. हा घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला महिलेने लगेच नवघर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विव्हरचना करत नवघर पोलिसांकडून एक पथक नेमण्यात आले. या पथकाने घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत, तांत्रिक तपास सुरू केला सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेतला. तेव्हा या गुन्ह्यातील आरोपी हे पिराणी पाडा भिवंडी, कल्याण आंबिवली येथे राहत असल्याची खात्री झाली. तेव्हा पोलिस त्यांच्या मागावर होते. गुप्त सूत्रांनी पोलिसांना माहिती दिली की आरोपी हे वफा कंपाउंड भिवंडी येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आपली वेशभूषा बदलून आरोपींचा शोध घेत होते पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात अखेर आरोपी अडकले व आरोपींच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. पोलिसांनी वेगळा पोशाख परिधान केल्यामुळे, आरोपींच्या ही लक्षात आले नाही तेंव्हा त्यांनी ओरडाओरड केल्याने त्या परिसरात राहणाऱ्या इराणी नागरीकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यामध्ये पोलीस किरकोळ जखमी झाले. भिवंडी, कल्याण आणि आंबिवली या भागात इराणी समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. नवघर पोलिसांनी अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. मुंबई ठाणेसह अनेक ठिकानच्या पोलीस ठाण्यात जबर चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी तसेच विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झाले आहे. तर एक आरोपी हा मोक्काचा फरार आरोपी असल्याचं आढळून आले आहे. आरोपींचे संपूर्ण कुटुंब चोरी, दरोडा अशा विविध प्रकरणात सामिल आहे.
पहाटे ४ ते सकाळी ८ पर्यंत पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. महिलांनी आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी, फेरफटका मारायला जाताना सोन्याचे दागिने घालणे शक्यतो टाळावे, अनोळखी इसमाशी बोलतांना सावध राहावे पोलिसांकडून असे आवाहन करण्यात आले आहे.