चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चार तासात बेड्या ठोकून केले गजाआड

 चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चार तासात  बेड्या ठोकून केले गजाआड

भाईंदर -  मानवतेला शर्मशार करणाऱ्या घटनेने मिरा-भाईंदर मध्ये खळबळ उडाली आहे.  चार वर्षांच्या चिमुरडीला बसमधून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य विकृतीने केलेच पण याचा सुगावा कोणाला लागू नये म्हणून व केलेला गुन्हा लपवण्यासाठी  पीडित चिमुकलीला  पोत्यात बांधून  फेकून देणाऱ्या  नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकुन गजाआड केले आहे.

"मुलं म्हणजे , देवाघरची फुल" असे म्हटले जाते. पण एका वासनेने बरबटलेल्या हैवानाने मात्र या कोवळ्या जीवांच्या अब्रूचे लचके तोडण्याचे काम केले आहे.  विकृत मानसिकता, हैवानी हवस शांत करण्यासाठी  विकृती या कोवळ्या जीवाना आपल्या वासनेची शिकार सहजतेने बनवत आहेत. वासनेची भूक भागवण्यासाठी ही विकृती कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही.  भाईंदर पश्चिमच्या  परिसरात राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले असल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. 

भाईंदर पश्चिमे कडील भोला नगर येथे झोपडपट्टीतील लहान मुलं  दुपारच्या वेळी लक्झरी बस मध्ये खेळत होती. काही वेळाने हि बस निघून गेली त्यावेळी सर्वजण बसमधून खाली उतरले मात्र चार वर्षांची चिमुकली गायब असल्याचे दिसल्याने मुलगी बेपत्ता झाली असल्याची जाणीव झाली तेंव्हा मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि पोलिसांना सर्व हकीगत सांगितली पोलिसांनीही तात्काळ गुन्हा दाखल केला पीडित मुलीच्या घरच्यानीं दिलेल्या फिर्यादीच्या म्हणण्यावरून बस चालकाविरुद्ध भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७१७ T / २०२० भा.दं.वि. सं. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाईचे चक्र गतिमान करत बस चालकाचा शोध लावला. यावेळी आरोपी बसचालक वसई माणिकपूर येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी शिताफीने आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला. बसमध्येच लैंगिक अत्याचार करून चार वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले. तसेच प्लास्टिकच्या पोत्यात भरून वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला तिला फेकण्यात आल्याचे समजले. पोलिसांनी ताबडतोड घटनास्थळी धाव घेत शोध घेतला असता वालीव पोलिसांनी ही चिमुकली जखमी अवस्थेत आढळून आली. मुलीचा शोध घेतला तेंव्हा अजब प्रकार समोर आला. रविवारी दुपारच्या वेळी नराधमाने मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि पीडित चार वर्षांच्या चिमुरड्या मुलीला गोणीत बांधून वसई वालीव पोलीस ठाण्यात च्या हद्दीत फेकून देण्याचे कृत्य केले. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या चार तासात बस चालक असलेल्या नराधमाला अटक करून गजाआड केले आहे तर पीडित चिमुरडीला उपचारासाठी मुंबईच्या नायर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२) ( i ), (३७६) (३) , ३०७, २०१  सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम ४, ८, १२  या कलमाखाली गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीला माननीय न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने २८ तारखेपर्यंत आरोपीस पोलीस कोठडी सुनावलीआहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले सांगितले. एका चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर हा दुर्दैवी प्रसंग घडल्याने मिरा भाईंदर शहरातील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास हा श्री संजय कुमार पाटील पोलीस उपायुक्त ( अतिरिक्त कारभार )मीरा-भाईंदर , डॉक्टर शशिकांत भोसले (सहाय्यक पोलीस आयुक्त भाईंदर विभाग , यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव (पोलीस ठाणे भाईंदर),  पोलीस निरीक्षक वनकोटी (गुन्हेशाखा मीरा-भाईंदर) , पोलिस निरीक्षक बडाख (गुन्हे शाखा वसई), पोलीस निरीक्षक चौगुले (पोलीस ठाणे वालीव), भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण वळवी, महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा पाटील व त्यांच्या तपास पथकाने ही कामगिरी बजावत आरोपीला गजाआड केले आहे.