विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरीय क्विझ स्पधेचे आयोजन

 विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरीय क्विझ स्पधेचे आयोजन

ठाणे:- महाराष्ट्राचा क्रीडा विभाग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरीय क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे .निरोगी सवयींची चाचणी करणे आणि त्यांचे प्रशिक्षण देणे हे मुख्य उद्दीष्ट आहे. प्रश्नोत्तरी स्पर्धा पोषणतंदुरुस्ती आणि क्रीडा या विषयावरील प्रश्रांचा समावेश असेल. निरोगी आरोग्याची चाचणी करणे आणि त्यांचे प्रशिक्षण देणे हे मुख्य उद्दीष्ट आहे. या स्पर्धेसाठी वय गट  ४ ते ७ वर्ष , ८ ते ११ वर्ष ,१२ ते १७ वर्ष  असा आहे.

सहभागी होण्यासाटी सर्व शाळा आणि विदयार्थ्यांनी ३० डिसेंबर 2020 पर्यंत नवीन नोंदणी करावी.प्रत्येक वयोगटातील टॉप ५ विदयार्थ्यांना ट्रॉफी व शिफारस पत्र क्रीडा संचालनालयमहाराष्ट्र यांचेकडून मिळेलप्रत्येक वयोगटातील विजेत्या विदयार्थ्यांना विजयी ट्रॉफी व प्रमाणपत्र क्रीडा संचालनालयमहाराष्ट्र यांचे विशेष कौतुक असलेले प्रमाणपत्र प्राप्त होईल. ठाणे जिल्हयातील जास्तीत जास्त शाळा व विदयार्थ्यांनी सहभागी व्हावे. xpl.news/energize_quiz या संकेत स्थळावर   या स्पर्धे विषयी सविस्तर माहिती उपलब्ध आहे.असे ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी,यांनी कळविलेआहे