मिरा-भाईंदर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तारदिन साजरा

 मिरा-भाईंदर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तारदिन साजरा

मिरारोड : (रोहित आसले) मिरा-भाईंदर शहरात सामाजिक संघटना एक विचार एक मंच व बाबासाहेब आंबेडकर टीचर असोसिएशन च्या वतीने मिरारोड येथे नामविस्तार दिवसाचा २७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या शहराच्या महापौर यांनी हजेरी लावली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 'नामविस्तार दिन' सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आसतो. पण या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे धुमधडाक्यात साजरा होणारा नामविस्तार दिन साध्यपध्दतीने सगळीकडे साजरा केला गेला आहे.  त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्ताराच्या निर्णयानं राज्यात स्वातंत्र्य, समता, एकता, बंधुत्वाचा विचार अधिक भक्कम केला अशी प्रतिकीर्या व्यक्त केली आहे.

कित्येक वर्षे नामांतराचा लढा लढल्या नंतर आंबेडकरी चळवळीला थोडे यश मिळाले आणि नामांतरा ऐवजी नामविस्तारावर समाधान मानावे लागले होते. १४ जानेवारी १९९४ ला हे नामविस्तार करण्यात आला तेंव्हा पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी गावं खेड्यापासून ते शहरापर्यंत नामविस्तार दिवस मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरा केला जातो. त्याच धर्तीवर मिरा-भाईंदर शहरातिल सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन २७ वा नामविस्तार दिन मोठया उत्साहात साजरा केला साजरा केला आहे. या कार्यक्रमाला मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर जोस्त्याना हसनाळे उपस्थित होत्या तर अनेकानीं आपले विचार या ठिकाणी मांडले  विद्यापीठ नामविस्तार दिनाचे महत्व आंबेडकरी चळवळीत एक मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठवाडयात अनेक ठिकाणी दिवसभर नामविस्तार दिनाचे औचित्य साधून वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवले जातात. तर औरंगाबाद येथे विद्यापीठ असलेल्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची लक्षणीय उपस्थिती असते. नामांतर लढ्यातील शहिदांचे स्मरण करीत नामविस्तार दिन साजरा करण्यात येत असतो. यानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात आणि   विद्यापीठ प्रवेशद्वार आणि शहीद स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची गर्दी उसळली पाहायला मिळत असते . मराठवाड्यातील हजारो अनुयायांनी अभिवादन कार्यक्रमात सहभाग घेतात. पण यावर्षी कोरोना साथीचे देशावरचे संकट पाहता आणि सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करत, सरकारने केलेल्या आव्हाला साथ देत अनेकांनी आपल्या घरीच राहून हा नामविस्तार दिवस साजरा केला आहे.  मिरा-भाईंदर मध्ये आयोजित केलेल्या नामविस्तार दिनाच्या वर्धापनदिनानिमित्तच्या कार्यक्रमात महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या शुभहस्ते पदाधिकारी व मान्यवर कार्यकर्ते यांना पुस्तक व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले , या कार्यक्रमाला आरपीआय चे रमेश गायकवाड मुंबई युवा अध्यक्ष ,अध्यक्ष देवेंद्र शेलेकर,  चंद्रमनी मनवर , युवराज अहिरे, विध्याधर किर्तवडे  के के ठोकळ,  प्रा. उत्तम भगत व ,प्रा. सुनील धापसे, आयुनि.अश्विनी कांबळे (आचार्य) प्रा. भास्कर पैठणकर व दिलीप लोंढे व अहिरे साहेब प्रा. डॉ. अनिल धीमधीमें सर ,          प्रा. अशोक गायकवाड,   प्रा.  बाळासाहेब गिरी,      प्रा. मिलिंद जाधव,        आयु. दादासाहेब थोरात,  हे मान्यवर उपस्थित होते.