केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांची सुरक्षेत कपात केल्यामुळे भाईंदर मध्ये आरपीआयचे आंदोलन
मिरारोड - प्रतिकूल परिस्थितीत मात करून देशाच्या राजकारणात आपली वेगळी छाप पाडणारे, दलित,पीडित,शोषित,गरिबांचा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे. ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात भाईंदरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष शेलेकर यांच्या नेतृत्वाखाली व युवा आघाडीच्या वतीने शहर युवा अध्यक्ष प्रफुल वाघेला यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी १२ वाजता नवघर नाका, भाईंदर येथे शांततेत आंदोलन करण्यात आले व सरकारला निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील मंत्र्यांना व नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेविषयी आढावा घेण्यात आला होता. त्यानंतरच हा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांकडून समजतंय. यावेळी भाजप नेत्यांसह इतर पक्षांच्या नेत्यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तर काही जणांची सुरक्षा वाढवली गेली आहे त्यामध्ये वकील उज्ज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. निकम यांना झेड दर्जाची सुरक्षा तर शत्रुघ्न सिन्हा यांना वाय दर्जाची सुरक्षा एस्कॉर्टसह देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या निर्णयाचा घाव आरपीआय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची सुरक्षेत कपात केली गेली आहे . महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे आघाडी सरकारच्या विरोधात आरपीआय चे कार्यकर्ते आंदोलन करतांना दिसून येत आहेत. त्याचे पडसाद मिरा-भाईंदर शहरात ही पाहायला मिळाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या मिरा-भाईंदर शहर आरपीआय जिल्हा अध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन केले गेले तर त्याच ठिकाणी पुन्हा मिरा-भाईंदर शहराच्या युवा आघाडीच्या वतीने प्रफुल वाघेला व मुंबई प्रदेश अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यासह भाईंदर पूर्व च्या नवघर पोलिस ठाण्याच्या समोर आंदोलन करण्यात आले. आघाडी सरकारच्या विरोधात घोषना देत लवकरात लवकर रामदास आठवले यांचे संरक्षण परत देण्याची मागणी केली आहे. संरक्षणातील कपात थांबवली नाही तर संपूर्ण देशात आंदोलन करण्यात येतील व आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल अशी प्रतिकीर्या कार्यकर्त्याकडून देण्यात येत होत्या. जिल्हा अध्यक्ष व युवा आघाडीच्या वतीने नवघर पोलिसांना निवेदन दिले गेले. तर युवा आघाडीने केलेल्या आंदोलनात आरपीआय चे शहर विभाग प्रमुख चंद्रमनी मनवर, माजी सरचिटणीस मंगेश होनमुखे, सुनील शर्मा, सुरेश सरोज, राहुल मकवाना, कृष्णा जयस्वाल,विकी वाटोरे, विशाल गुप्ता,गणेश तांदळेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. एकाच दिवशी काही आवधीतच एकाच पक्षाकडून एकाच विषयावर दोन आंदोलने केल्यामुळे पोलिसात ही गोंधळ उडालेला दिसून आला तर कार्यकर्त्यांत ही संभ्रम झालेला दिसून आला.