पतंगाच्या मांजाने साहाय्यक पोलिस निरीक्षक यांचा गळा चिरला

 पतंगाच्या मांजाने साहाय्यक पोलिस निरीक्षक यांचा गळा चिरला


मुंबई : मकरसंक्रांत सण सगळीकडे धूम धडाक्यात साजरा केला जातो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे बोलून एकमेकांना तिळगुळ दिला जातो.  तर त्याच बरोबर तरुणाई पतंग हवेत उडवण्याची मजा घेत असते . सध्या पतंग उडवण्याचे फॅड मोठ्याप्रमाणात सुरू आहे बाजारात विक्रीसाठी येणारे रंगीबेरंगी पतंग आणि त्याला लागणारा धागा (मांजा) हा वेगवेगळ्या धातूचा मुलामा देत बनवला जातो आहे त्यामुळे हा मांजा पक्षासाठी जीवघेणा बनला आहे. कित्येक पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आपले कर्तव्य बजावत असलेले मुंबई पोलीस अधिकारी राकेश गवळी यांना ही या मांजा ने गंभीर जखमी केल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसात नोकरी करत असलेले राकेश गवळी हे वरळी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत ते दिनांक १८ जानेवारी रोजी आपल्या कर्तव्यावर हजर असतांना सेशन कोर्टातुन वरळी पोलीस ठाण्याकडे जात असताना  पतंगाच्या धारधार मांजाने त्यांच्या गळा व मानेवर  लागला त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेतत्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्याना वोकार्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून गळ्याला गंभीर दुभापात झाली असून मानेवर व गळ्यावर दहा टाके मारण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे. कोणत्याही सणाच्या निमित्ताने आनंदपर्व बनवत असतांना त्याचे वाईट परिणाम होणार नाहीत हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे असा सुज्ञ नागरिकांकडून प्रतिकीर्या येत आहे. कोणाचेही काही नुकसान होणार नाही कोणालाही आपण घेत असलेल्या आनंदामुळे दुखापत पोहचणार नाही ही काळजी घेणे आवश्यक आहे.