कधी थांबणार ? काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लॉजिंग बोर्डींगच्याआड चाललेले वेश्याव्यवसाय

 कधी थांबणार ? काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लॉजिंग बोर्डींगच्याआड चाललेले वेश्याव्यवसाय 


काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिरा-भाईंदर शहरातील असलेल्या लॉजिंग बोर्डिंग पैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लॉजिंग बोर्डिंग काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत लॉजिंगचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळत आहे. या भागात कोणतेही पर्यटन स्थळ नाही तरीही एवढ्या लॉजिंग चालतात कशा हा प्रश्न सहजपणे प्रत्येकाला पडतो तर याचे साफ साफ उत्तर आहे की, लॉजिंग च्या आड चालणारे व चालवले जाणारे अनैतिक व्यवसाय, वेश्या व्यवसाय होय. याचा परिणाम या परिसरातील तरुणाईवर होतांना दिसत आहे. तर नाहक या परिसरातील महिलांना, मुलींना, या बार, डान्सबार, लॉजिंग मध्ये आलेल्या ग्रहाकांच्या मनचलेपणाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे शासनाला व राजकीय पुढाऱ्यांना दिसणार कधी ?  लॉजिंग बोर्डींगच्याआड चाललेले वेश्याव्यवसाय थांबणार कधी हा प्रश्न या परिसरातले नागरिक विचारत आहेत.


काशिमीरा पोलिसांकडून वारंवार छापे मारूनही बार , डान्सबार मध्ये ,  आर्केस्ट्रा नावाखाली चालणारी अश्लीलता थांबत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पोलिसांचा छापा पडण्याच्या पूर्वीच त्या डान्सबार मालकांना खबर पोहचते कशी आणि पोलीस पोहचण्यापूर्वीच मुली लपवण्यासाठी केलेल्या गुप्त खोलीत मुली गायब होतात कशा याचा उलगडा होणे खूप  गरजेचे आहे. अशी प्रतिकीर्या या परिसरातिल नागरिकांमधून ऐकायला मिळते आहे. त्यामुळे पोलिसांनी छापा टाकला काय आणि कारवाई केली काय याचा फारसा परिणाम या बारमालकांवर झालेला दिसून येत नाही. त्यामुळे या परिसरातले डान्सबार असो या लॉजिंग हे वेश्या व्यवसायाचे अड्डे बनलेले आहे हे मात्र शतप्रतिषद खरे होत आहे.

 काल रात्री काशिमीरा पोलिसानी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दहिसर चेचनाक्या जवळच्या, पेनकरपाडा विभागातील लक्ष्मी लॉजिंग बोडिंग येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे खात्रीकरून बोगस ग्राहक  पाठवून पोलिसांनी छापा टाकला आणि पोलिसांच्या छापामध्ये व्यवस्थापक, रोखपाल, वेटर यांना  ताब्यात घेत, एका पीडित मुलीची त्यांच्या तावडीतून सुटका  केली आहे. खरे तर बऱ्याच महिला व मुली त्यांच्या कुटुंबातील अडचणी दूर करण्यासाठी या गैरमार्गाचा वापर करतात, तर काही मजबुरी म्हणून यात ओढल्या जातात, तर काहींनी हा मार्गच स्वीकारलेला दिसून येत आहे. त्यामुळे स्वमर्जीने हा व्यवसाय डान्सबार,लॉजिंग च्या लोकांशी संगनमत करून करतात अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.


पोलिसांच्या कारवाईने थोडी भीती निर्माण केली तरी त्यांचे मनोबल खचते असे आतापर्यंतच्या झालेल्या कारवायामधून दिसून येत नाही. हे ही  तेवढेच खरे म्हणावे लागेल .

लक्ष्मी लॉज वर टाकलेल्या छाप्यात मिळून आलेल्या मॅनेजर, कॅशियर व वेटर यांच्यावर पिटा कायद्याअंतर्गत काशिमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून भादवि कलम ३७० सह पिटा कायदा कलम ४, ५, ७, प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. तर पीडितेला महिला सुधार गृहात पाठवण्याची पोलीस तयारी करत आहेत. तर या लॉज चा मालक मात्र फरार दाखवण्यात आला आहे. या शहरात लॉजिंग बोर्डिंग वरील कारवाया असो या डान्सबार वरील कारवाया या मध्ये जवळपास एक मात्र पोलीस विभागाकडून सूत्र केलेले दिसून  येत असते की, बार,डान्सबार, लॉजिंग चे मालक मात्र फरार दाखवलेले आतापर्यंत केलेल्या  बऱ्याचशा कारवाईत पाहायला मिळते आहे. ही कारवाई मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय हजारे यांच्यासह काशिमीरा पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाने केली आहे.