कधी होणार मीरा-भाईंदर शहर डान्स बार, लॉजिंग , स्पा, मसाज पार्लर,हुक्का च्या आड चालणाऱ्या अनैतिक धंद्याच्या विळख्यातून मुक्त
मायानगरी मुंबई च्या पायथ्याशी वसलेलं आणि वाढते औद्योगिकीकरण नागरीकरण यांचा झपाट्याने होत असलेला विकास पाहता या मीरा-भाईंदर शहराला वाढत्या नागरीकरणाच्या बरोबरच शहराला लागलेले ग्रहण म्हणजे शहरातले अनेतिक धंदे आहेत असे शहर वाशियांना वाटते आहे. या छोट्याशा टुमदार शहराचा होत असलेला विकास पाहता येण्याची धंद्याने आपले जाळे मात्र तेवढ्याच तेजीने पसरवायला सुरुवात केली आहेत शहरातील अतिशय नेहमी चर्चेत राहिलेले अनाधिकृत लॉजिंग हुक्का पार्लर मसाज पार्लर हे व्यवसाय मोठ्या तेजीने वाढत आहेत या व्यवसायाच्या चालणारे अनैतिक धन्यांनी तोंड वर काढलेले आहे अनाधिकृत हुक्का पार्लर मसाज पार्लर स्पा पार्लर लॉजिंग मध्ये चालणाऱ्या व्यवसायाने या शहराची ओळख पुसण्याचे काम केले जात आहे या आईने ती धंद्यातून हे शहर मुक्त होईल का ही शंका शहरवासीयांच्या मनात येताना दिसते आहे. मीरा भाईंदर हे छोटेसे मायानगरी मुंबई च्या पायथ्याशी वसलेले टुमदार, सुंदर आणि निसर्गरम्य परिसर लाभलेले शहर म्हणून ओळखले जाते या शहराला काही वर्षापासून बदामीचा मार सहन करावा लागत आहे. पैशाच्या हव्यासापोटी शहरात वाढत चाललेली अतिक्रमणे, व्यवसायाचे वाढलेले स्वरूप नशेच्या पदार्थांची वाढलेली विक्री , चोरांचे बनलेले अड्डे , वेश्याव्यवसायानें बरबटलेल्या बार, लॉजिंग, मसाज पार्लर , हुक्का पार्लर, पाहता शहराचा इतिहास पुसला जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादात या शहरात अनेक अनधिकृत बार , लॉजिंग , मसाज पार्लर, हुक्का पार्लर , गेल्या काही वर्षापासून बिनधास्तपणे उभे राहत आहेत. कुठे रिपेरिंग परमिशन च्या तर कुठे न्यायालयाच्या स्थगिती आदेशाच्या आड अवैध बांधकामे पूर्ण करून ती वास्तू अवैध धंद्यासाठी वापरात आणली गेलेली अनेक बार,लॉजिंग मनपाच्या नाकावर टिचून उभे आहेत. मिरा-भाईंदर मनपाचे अधिकारी कोरडी डरकाळी देतात की, शहरातल्या अनधिकृत लॉजिंग, बारवर हातोडा मारू शहरातले अनाधिकृत लॉजिंग उध्वस्त करू, याची लिस्ट ही अधिकारी मीडियासमोर देतात, त्याची चर्चा की शहरात रंगते पण कारवाई मात्र गुलदस्त्यात लक्ष्मीदर्शना मागे अडकलेली दिसते. ही मनपाच्या अधिकाऱ्यांची ही खेळी आहे. तीच राजकारण्यांची परिस्थिती आहे. म्हणून शहरातील लोकांना काही वेगळी अपेक्षा राजकीय नेतृत्वाकडून असलेली दिसत नाही. अनेक लॉजिंग, बार, डान्सबार वर पोलिसांचे छापे पडले, अनेकांना अटक झाली, गुन्हे दाखल झाले पण याचा परिणाम मात्र या माफिया वर झालेला दिसून आलेला नाही. चोरीच्या मार्गाने स्थानिक पोलिसांना हप्ता देऊन या शहरातल्या लॉजिंग, बार, मसाज पार्लरमध्ये अनैतिक व्यवसाय चालवले जातात हे कितीतरी वेळा जनतेने आरोप केलेले आहेत कदाचित या आरोपात वास्तवता देखील असेल नसेल पण या अनैतिक धंद्यांना जोपासणारे नेमके कोण आहेत हे अद्याप तरी स्पष्ट उघड होत नसेले तरी या सगळ्यांचा प्रकारांना पाठीशी घालणारी येथील शासकीय यंत्रणा आणि राजकीय पुढारी यांचा सिंहाचा वाटा आहे आहे हे नाकारून चालणार नाही. शहरातल्या अनैतिक धंद्यांवर दिखाव्यासाठी कारवाई केली जाते पण पळवाटा शोधून लगेच पुन्हा हे अवैध धंदे सुरू असतात वेश्याव्यवसाय याने शहरातल्या सर्व सीमा ओलांडल्या दिसत आहेत. दलालांचा वाढता वावर दिसतो आहे. शहरात ग्रामीण पोलीस ठाण्या ऐवजी पोलीस आयुक्तालय निर्माण झाले आहे. पण अनैतिक कारभार्यांचे जाळे मात्र तसेच सुरू आहे. स्पा पार्लर, मसाज सेंटर, लॉजिंग, बार, ब्युटी पार्लर च्या आड केले जाणारे वेश्या व्यवसाय या शहराला बदनाम करत आहेत. हे अनैतिक व्यवसायातून हे मिरा-भाईंदर शहर मुक्त कधी होणार हा प्रश्न शहरवासीयांच्या मनात निर्माण झाला आहे.