खाजगी रुग्णालयाच्या लुटीला लगाम बसवण्यात मनपा कमी पडते का ?

 खाजगी रुग्णालयाच्या लुटीला लगाम बसवण्यात मनपा कमी पडते का ?


 

(करोना रुग्णाकडून उपचाराच्या नावाखाली अधिक रक्कम वसूल केल्याचे उघडकीस आल्यानंतरही आता पर्यंत  कार्यवाई का नाही)




भाईंदर :- सरकारी यंत्रणा संपूर्ण पणे कोरोना रुग्णांची सेवा देताना शहरात अधिक रुग्ण संख्या वाढत जात असतांना मनपाने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नियमावली बनवून देऊन उपचार देण्यात यावेत असे बंधनकारक करण्यात आले असतांना देखील खाजगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णाकडून अधिक रक्कम वसूल करण्यात  आली असल्याचे उघडकीस आले आहे. अधिक वसूल करण्यात आलेली रक्कम परत देण्यात यावी प्रशासनाकडून सांगण्यात आले असतांनाही रुग्णालयाकडून  दुर्लक्षपणा करण्यात येत आहे. असा धक्कादायक प्रकार होत असल्यामुळे पालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे आरोप रुग्णांकडून करण्यात येत आहेत. 


करोनाचे संकट डोक्यावर आल्यामुळे देशात टाळेबंदी नियम लागु करण्यात आला होता.मिरा भाईंदर शहरात देखील करोना आजाराचे रुग्ण समोर येत असल्यामुळे 


मिरा-भाईंदर महानगर पालिका प्रशासनाकडून कोविड रुग्णालय व उपचार केंद्राची निर्मिती करण्यात आली.मात्र रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे यात खाजगी रुग्णालयाचे सहकार्य घेण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले होते . 

महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात  कोविड-१९ अंतर्गत शासनाने दिलेल्या दरानुसार करोना बाधित  रुग्णांवर उपचारासाठी लागणारी  देयक आकारणी करणे आवश्यक होते पण तसे न करता अनेक खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि कोविड रुग्णांकाढून बिलाच्या नावाने अवाजवी अधिक रक्कम वसूल केली. असल्याच्या तक्रारी सातत्याने  मनपा प्रशासनाला प्राप्त होत होत्या. यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून लेखापरीक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या  बिलाचे  लेखापरीक्षन  विभागाकडून तपासणी  करणे बंधनकारक केले गेले. या समिती मार्फत पालिका प्रशासनाला प्राप्त झालेल्या तक्रारीच्या बिलाची तपासणी करण्यात येत आहे.आता पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारी नुसार पालिका प्रशासनाने  अनेक  रुग्णालयांच्या बिल आकारणीवर आक्षेप घेतला आहे. या पैकी काही रुग्णालयांनी आकारलेले  रुग्णांचे  बिलाची अधिक रक्कम परत केली आहे. मात्र शहरातील सहा रुग्णालयांना वारंवार सूचना देण्यात आल्या असून देखील पैसे परत करण्यास दिरंगाई पणा करण्यात येत आहे. यात फॅमिली केअर हॉस्पिटल, तुंगा हॉस्पिटल,  शेलोम हॉस्पिटल,  शाम भारती हॉस्पिटल , धन्वंतरी मानव कल्याण रुग्णालय, आणि श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलचा समावेश आहे. 


या रुग्णालयाच्या तब्बल ३६३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.या रुग्णालयांनी एकूण ४ कोटी २७ लाख ८९ हजार ३७ रुपयाची बिल आकारणी केली आहे. या बिलं आकरणीवर पालिकेमार्फ़त पडताळणी केल्यानंतर पालिकेने ३ कोटी ४२ लाख ८७ हजार ३३१ रुपये शेवटची  बिल रक्कम  ठरवण्यात आली. म्हणजे एकूण ८५ लाख १ हजार ७०६ रुपयांचा फरक निर्माण झाला आहे. त्यापैकी या रुग्णालयांनी २० लाख ३३ हजार ५०४ रुपये रुग्णांना परतडेड केले.मात्र अद्यपही ६४ लाख ६८ हजार २०२ रुपये रुग्णालयांमार्फ़त देण्यास वेळकाढूपणा करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांच्या कुटूंबियांना आर्थिक ताण सहन करावा लागत असून यांवर पालिका प्रशासन ठोस पाऊल उचलत नसल्याचे आरोप करण्यात येत आहे तर शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे असे अनेकांना वाटते आहे जेणेकरून पुन्हा अशी लूट होणार नाही आणि हॉस्पिटल चालकांमध्ये भीती निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 


कोट -


" अधिक पैसे आकारणी करण्यात आलेल्या रुग्णालयाची यादी तयार करण्यात आली असून त्यांना लवकरात लवकर पैसे परतफेड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. "


संभाजी वाघमारे - उपायुक्त ( वैद्यकीय विभाग)