ग्रामपंचायती निवणुकीत वंचितची जोरदार मुसंडी , २८० ग्रामपंचायतीवर वंचितचे बहुमत तर महाराष्ट्रात ३७६९ सदस्य
मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्यात वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत झालेल्या निवडणूकितील २८० ग्रामपंचायतिची सत्ता एकहाती घेतल्याचे दिसून येत आहे तर राज्यात वंचितचे ३७६९ उमेदवार विजयी झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडी ने महाराष्ट्रातील राजकारनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले लाखों चे मतदान आणि विधानसभा निवडणुकीत ढवळून निघालेला महाराष्ट्र पाहता भल्याभल्यांना नाकीनऊ आणून हादरा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सत्तेची दारे जरी उघडता आले नसली तरीही आपले वेगळे अस्तित्व व मतदारांवर आपली वेगळी छाप पाडली आहे. महाराष्ट्रात मतदारांचा वर्ग बनवण्यात वंचित ने यश मिळवलेले दिसून येत आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्यात वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारत राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकित वंचित बहुजन आघाडीचे ३,७६९ उमेदवार विजयी झाले आहेत तर २८० ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीने एक हाती सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा राज्यात ग्रामपंचायतवरती विजय मिळवणारा मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सामाजिक बदलात सामावून घेत सर्वसामान्य जनतेच्या हाती सत्तेची किल्ली देण्याचे काम करत आहे. केंद्रसरकार च्या मनमानीपणामुळे शेतकऱ्यावर लादलेले कायदे रद्द करावेत म्हणून अनेक राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेक राजकीय पक्षांनी, अनेक सामाजिक संघटनानी त्यांना पाठिंबा दिला आहे. पण केंद्र सरकारने मात्र आपली मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. गेल्यावर्षी देशभरात सिएए आणि एनआरसी बिल आणल्यामुळे आंदोलनाचा आगडोंब उसळला होता. कोरोनाच्या साथीचे आगमन झाल्यामुळे ते आंदोलन थोडे थंडावले असले तरीही दिल्लीत झालेल्या शाईन बाग आंदोलन लोक आजही विसरले नाहीत त्याच शाईन बाग आंदोलनाच्या धर्तीवर देशभर किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती दिली. याबाबत मुंबई मधिल भायखळा येथील खिलाफत हाऊस याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत माहिती दिली राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तीन हजार ७६९ उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले आहे तर २८० ग्रामपंचायतीवर वंचितने एक हाती सत्ता मिळवली आहे. ही सर्व माहिती आकडेवारी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा, तालुकास्तरावर घेतलेल्या अधिकृत माहितीवरून पत्रकारांना देण्यात आली आहे.