अनधिकृत बांधकामाना संरक्षण देणाऱ्या प्रभाग अधिकारी यांच्यावर आयुक्त , उपआयुक्त मेहेरबान आहेत का ?
आयुक्त महोदय कधी होणार अवैध बांधकामाना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन
मिरा-भाईंदर मनपा कार्यक्षेत्रात अनेक प्रभागात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मनपा कडून तोडक कारवाई केली जाते पण मनपा अधिकारी पाठमोरे होत नाहीत तेच तोडलेले अनधिकृत बांधकामे पुन्हा उभे केले जाते हे शहरातले वास्तव आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक 4 च्या प्रभागात प्रभाग अधिकारी अविनाश जाधव यांच्या लालची भूमिकेमुळे अनधिकृत बांधकामाचे मोठ्या प्रमाणात पेव फुटलेले असतानाही प्रभाग अधिकारी मात्र कुंभकर्णाची झोप घेऊन वाढलेल्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याची भूमिका निभावत आहेत. गॅस गोडाऊन जवळचे अनधिकृत बांधकाम, विजय सेल्स च्या बाजूला असलेले बांधकाम , हाटकेश चौकातील अनधिकृत बांधकाम, घोडबंदर रोड लगत सुरू असलेले व्यावसायिक कंपनीचे बांधकामें घोडबंदर येथील मॉर्डन कंपनी मधिल अवैध अनधिकृत बांधकामे असे अनेक बांधकामे आहेत ज्या बांधकामांना वाचवण्यासाठी ठेकेदाराकडून मोठी रक्कम अधिकाऱ्यांना पुरवली जाते, तेव्हाच ते अनधिकृत बांधकामांना वाचवण्यासाठी कसोटीचे प्रयत्न करत असतात त्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवण्याचे काम केले जाते असे प्रभागातील नागरिकांनी सरळ-सरळ आरोप केले आहेत. प्रभाग अधिकारी हे जाणीवपूर्वक तक्रार दारांचे फोन उचलत नाहीत , प्रभागात आलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवणे हे प्रकार केले जात आहेत ठेकेदाराकडून बिनधास्त पणे ऐकायला मिळते आहे की, मोठी रक्कम पोहचवल्या शिवाय अनधिकृत बांधकामे टिकते का ? असा प्रति प्रश्न ठेकेदार करताना ऐकायला मिळते आहे. मग हे अधिकारी हे बांधकामे का तोडत नाहीत कित्येक तक्रारी प्रभागात धूळखात पडून आहेत कित्येक स्मरण पत्रे देखील कार्यालयात पडून आहेत पण प्रभाग अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर ठेकेदाराच्या काळ्यालक्ष्मीची पट्टी असल्यामुळेच अधिकाऱ्यांची तोडक कारवाई करण्यास हिंमत होत नाही असे अनेक तक्रारदारांचे म्हणणे आहे . प्रभाग समिती क्रमांक 4 मधल्या अनधिकृत बांधकामाना पाठीशी घालणाऱ्या प्रभाग अधिकारी अविनाश जाधव व प्रभागातील इंजिनियर यांच्यावर उपआयुक्त, आयुक्त मोहदय मेहेरबान का आहेत हा प्रश्न पडतो आहे . अवैध बांधकामांना संरक्षण देऊन पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी ही मागणी प्रभागात व शहरात जोर धरू लागली आहे.