भाजपाचा दुपट्टी चेहरा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध

 भाजपाचा दुपट्टी चेहरा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध


मिरारोड - ज्या   छत्रपती शिवाजी महाराजांचे नावं घेऊन सत्तेत आले त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध मिरा-भाईंदर मधिल सत्ताधारी भाजपा करत असल्याचे उघड होत आहे , महाराष्ट्रातिल जनतेच्या हृदयात राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मंजुर असतांनाही सत्ताधारी भाजपाच्या स्थायी समिती सदस्यांनी निविदा प्रक्रियेला विरोध करीत हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यामुळे शहरातील शिवप्रेमीमध्ये तीव्र संताप  पसरला आहे. 


 भारत देशाला अनेक महापुरुषांचा प्रेरणादायी इतिहास आहे. या प्रेरणादायी इतिहासामुळे एक बदलाची, परिवर्तनाची क्रांती निर्माण होत असते. त्या महापुरूषा प्रति जनतेच्या मनात अत्यंत आदर असल्यामुळे महापुरुषांचे स्मारक, स्तंभ, पुतळे उभे करण्याची मागणी वाढत असते, जेणेकरून येणाऱ्या पिढी ला जाणीव होऊन त्यांचा आदर्श आणि विचार जनमानसात चिरकालमय टिकतील ही प्रामाणिक भावना निर्माण झालेले असते. मिरा-भाईंदर शहरात अनेक महापुरुषांचे पुतळे उभा करावेत अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत, त्यामध्येच छत्रपती शिवरायांचा पूर्ण कृती पुतळा काशिमिरा नाका याठिकाणी अनेक वर्षापूर्वी बसवण्यात आलेला आहे. त्या पुतळ्याच्या बाजूने फ्लाय ओव्हर आणि मेट्रो जात असल्यामुळे नवीन पुतळा या शहरात निर्माण करण्यात यावा अशी मागणी केली गेली होती त्याच अनुषंगाने वेस्टन हॉटेल च्या जवळ सनई माता मंदिराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती अश्वारूढ असलेला पुतळा बसवण्याची मागणी वाढल्यामुळे त्या प्रक्रियेला गती येऊन महानगरपालिकेने तसा ठराव मनपाच्या सभागृहात पारित केला गेला या ठरावाला कोणत्याही पक्षाने विरोध न करता बहुमताने ठराव पास करण्यात आला आणि त्याच्या निविदा देखील  काढण्यात आली मीरा भाईंदर महापालिकेची स्थायी समिती सभा सोमवारी पार पडली. घोडबंदर सगणाई देवी जवळील महामार्गा लगतच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ ३० फूट उंचीचा पुतळा उभारण्याच्या निविदा मंजुरीच्या प्रस्तावास पालिकेतील सत्ताधारी भाजपने स्थायी समिती सभेत विरोध केला. भाजपचे स्थायी समितीमध्ये बहुमत असल्याने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव भाजप सदस्यांनी फेटाळून लावला आहे. यामुळे भाजपाच्या धुपती भूमिकेवर ती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत छत्रपतिंचा आशिर्वाद म्हणत सत्यमूर्ति येणाऱ्या भाजपात ला आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात रस नसल्याचे जाणवत आहे.

घोडबंदर कडे जाणाऱ्या रस्त्याजवळ असणाऱ्या जंक्शन ला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३० फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचा ठराव २ फेब्रुवारी २०१९ रोजी महासभेत एकमताने मंजूर झाला होता. ब्रॉंज धातूचा पुतळा बसविण्याची निविदा प्रक्रिया पालिका प्रशासनाने पूर्ण केली. या निविदेला मंजुरी देण्याचा विषय स्थायी समिती सभेत पालिका प्रशासनाकडून आला होता. पालिकेतील सत्ताधारी भाजपने महाराजांच्या पुतळ्याचा विषय फेटाळून लावल्याने त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. निवडणुकांमध्ये छत्रपतींच्या नावाने मतांचा जोगवा मागणारे सत्तेसाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करणारे भाजपचे नगरसेवक जेव्हा दुपट्टी भूमिका घेतात भाजपचा खरा चेहरा बहुजनांच्या समोर येत आहे. ज्यांनी स्थायी समिती सभेत पुतळ्याला विरोध केला अशा बेगडी भाजप स्थायी समिती सदस्यांना शिवसेना महिला आघाडीतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात येईल , असा इशाराही शिवसेने कडून देण्यात आला आहे.राजकीय पक्षांनी आत्तापर्यंत या देशातील राज्यातील आणि शहरातील जनतेला महापुरुषांचे पुतळे , समारक या सारख्या  भावनिक मुद्द्यांना हात घालून गुंतवून ठेवत आपल्या सत्तेची पोळी भाजलेली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जसा भाजपाने विरोध केल्यानंतर शहरातल्या विरोधी पक्षांनी याचेही राजकारण सुरू केल्याचे समोर येताना दिसत आहे. या संधीचा फायदा घेऊन व पुन्हा विरोधकांकडून महापुरुषांचा नावांचा वापर करून सत्ता मिळवण्यासाठी हालचालींना वेग येत असल्याचे दिसून येत आहे.  मग पक्ष कोणताही असो ते मात्र सत्तेच्या खुर्चीसाठी महापुरुषांच्या विचारधारेला जनमानसात रुजविण्या पेक्षा त्यांचा पुतळ्याच्या , स्मारकाच्या नावाने राजकारण्या वर जास्त भर देऊन ते विषय लटकवत ठेवून राजकारण करण्यात अधिक धन्यता मानतात असेच चित्र दिसून येत आहे.


प्रतिकीर्या


भाजपा हा आरएसएस च्या इशाऱ्यावर काम करणारा पक्ष आहे , नथुराम गोडसेना मानणारा  पक्ष आहे, कृष्णा भास्कर कुलकर्णी चा वारसा जपणारे भाजपा वाले आहेत. बेसावध असतांना वार करने ही भाजपा ची नीती आहे, हे छत्रपतींचा वारसा कसे काय चालवणार ? आणि त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणे म्हणजे मनाला दिलेली भोळीभाबडी समज होय. 


ऍड. रोहित आसले 


रिपब्लिकन सेना मिरा-भाईंदर शहर जिल्हा प्रमुख