रिक्षा चोराला काशिमीरा पोलिसांनी केले गजाआड

 रिक्षा चोराला  काशिमीरा पोलिसांनी केले गजाआड 


रिक्षा चोराला पोलिसांकडून चार तासात अटक


मिरारोड - चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदीवस शहरात वाढ होत आहे. शहरात पोलीस आयुक्तालय आले पण चोरांची दहशत मात्र कमी झालेली दिसून येत नाही. काशिमिरा विभागात नशाखोरांची वाढत्या संखे बरोबरच भुरट्या चोरांचा वाढता वावर सुरूच आहे. काशिमीरा नाक्या जवळून मंगळवारी सकाळी एक रिक्षा चोरीला गेल्याची घटना घडली होती.त्या रिक्षा चोराला चार तासातच गजाआड जावे लागले आहे.  


वाढता कोरोनासाथीचा प्रभाव आणि नागरिकांचा निष्काळजी पणा पाहता सरकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याचे वाढते प्रमाण पाहता खबरदारी उपाय म्हणून मास्क न घालणाऱ्या वर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.  ही कारवाई करत असताना रिक्षा चोर अलगद या कारवाईत अडकला त्याने  मास्क घातला नव्हता तेव्हा कारवाई दरम्यान अधिक तपासनी केली असता वापरत असलेली रिक्षा ही चोरी केलेली आहे असे समोर आल्याने त्याच्या मुसक्या अवळण्यात आल्या.


        दिवसा ढवळ्या काशिमीरा येथुन मंगळवारी सकाळी रफिक सत्तार शेख यांची रिक्षा ऊभी असताना अचानक काही अज्ञात चोरट्यांनी रिक्षा मालकाचे लक्ष नसताना रिक्षावर डल्ला मारला व रिक्षा घेऊन हे चोर फरार झाले. 

ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. रिक्षा मालक रिक्षा व चोरांचा शोध घेत होता. वाहतूक शाखेचे पोलीस सकाळी ११ च्या दरम्यान काशीमीरा ब्रिज खाली मास्क न लावणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करत असताना अचानक नाका बंदी दरम्यान त्यांना समोरून (MH 04 HZ 8557 ) ही रिक्षा येताना दिसली व त्या रिक्षा चालकांने मास्क घातला नसल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला अडवले होते.त्यावेळी ड्रायव्हर सह इतर ३ जण देखील रिक्षात पाठी मागे बिना मास्क बसले होते. त्याच्यावर मास्क न घातल्यामुळे कारवाई करत असताना तेवढ्यात घटना स्थळी  रिक्षा मालक रफिक शेख आले व त्यांनी रिक्षा त्यांच्या मालकीची असल्याचे सांगून  सकाळी ८ च्या सुमारास या ४ जणांनी रिक्षा चोरल्याचे सांगितले. वाहतूक पोलिसांनी रिक्षा चोरणाऱ्या चारही जणांना ताब्यात घेत आरोपींना गजाआड केले  काशिमीरा पोलीस ठाण्यात या चौघा जणांविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यावेळी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे व पोलीस उप निरीक्षक सुधीर पाटील,कर्मचारी जितू जाधव,सज्जन गीते, घुगे यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे चार तासात रिक्षा चोर पकडण्यात यश आले  आहे.