मिरारोड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
मुद्रांक दस्तऐवजात फेरफार करून अनेकांना फसवत शासनाचा बुडवला शासनाचा महसूल
मिरारोड : सरकारची दिशाभूल करून,व लोकांची फसवणूक करून आपली तिजोरी भरणारे अनेक महाभाग आहेत. तसाच प्रकार मिरा-भाईंदर मध्ये घडला आहे. शासनाचा महसूल बुडवून मुद्रांक कागदपत्रे हेराफेरी करून अनेकांना फसवले व शासनाचा महसूल बुडविला गेला आहे. या प्रकाराची नोंद घेऊन आणि तपास करून अहवाल पाठविण्याचे ठाणे न्यायालयाने मीरारोड पोलिसांना आदेशीत केले आहे.
मुंबईला लागून असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये वाढत्या नागरीकरणाचा बरोबरच अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य वाढत आहेत त्याच बरोबर सामान्य नागरिकांचा फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस जोर धरत असतानाच सरकारचा महसूल आला ही शेत देऊन आपल्या तिजोरीत जमा करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात कार्यरत झालेली दिसून येत आहे . मिरारोड विभागाच्या बेव्हर्ली पार्क येथे असलेले एस.के. इंटरप्रायजेस ह्या दुकानामध्ये सदनिका, दुकाने यांचे करार नोंदणीसाठी लागणारी मुद्रांक शुल्क, नोंदणी फी शासनाच्या खात्यात चलनद्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीने जमा करून करारनामा नोंदणीकृत करण्याची सुविधा आहे. यासाठी शासनाचे परवाना धारक एजंट आहेत. मीरारोड येथील येथील बेव्हरली पार्क भागात एस.के. इंटरप्राईजेस या नावाने परवाना धारक गणेश लोहकरे अशा प्रकारची कामे गेली पाच वर्षांपासून करण्यात येत आहेत. त्यांच्या कामाची व्याप्ती वाढत गेल्यामुळे त्यांनी सागर आरडे नावाच्या व्यक्तीला सहाय्यक म्हणून कामावर ठेवले.
गणेश लोहकरे गृहनिर्माण संस्था, दुय्यम निबंधक सहकारी संस्था यांचे लेखा परीक्षण कामात व्यस्त असल्याने त्यांनी आपल्या सहकाऱ्यावर विश्वास ठेऊन त्याच्यावर स्वतंत्र कामाची जबाबदारी टाकली. त्याचाच गैरफायदा घेत त्यांनी हेराफेरी सुरू केली. ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करताना भाडे करारातील नमूद भाडे, कमी दाखवून व त्याच्या मध्ये खोटी माहिती, कमी भाडे रक्कम लॉगिंग करून कमी मुद्रांक शुल्क शासनास भरले व दस्त नोंदणीच्या वेळी शासनाच्या संकेतस्थळा वरून मिळणाऱ्या चलान मध्ये हेराफेरी करून कागदपत्रे तयार केले, ज्यामध्ये संपूर्ण मुद्रांक शुल्क भरल्याचे दर्शविले व सदर बनावट चलान पक्षकारास देऊन त्यांना मुद्रांक पोटीची पूर्ण रक्कम भरल्याचे भासविले. अशा पद्धतीने शासनाच्या महसूलाला लाखोचा चुना लावणाऱ्या कंपनीला एका करारनामाकर्ते कडून विचारणा झाल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. याबाबत २९ डिसेंबर २०२० रोजी मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली. परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने तक्रारदाराने न्यायालयात फौजदारी प्रमाणे १५६ (३) प्रमाणे दाद मागितली असता न्यायालयाने सागर आरडे याच्यावर गुन्हा नोंद करून, पुढील तपास करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. मीरारोड पोलिसांनी अशा प्रकारचा आदेश १७ फेब्रुवारीला प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगितले आहे.