वाढत्या कोरोनाने मिरा-भाईंदर आज पुन्हा हादरले

 वाढत्या कोरोनाने मिरा-भाईंदर आज पुन्हा हादरले



कोरोना बाधीतांची दैनंदिन मोठ्या प्रमाणावर वाढणारी संख्या पाहता मिरा-भाईंदर शहरातआटोक्यात असलेली कोरोना बाधित रुग्णांची संख्या आज साडे तीनशे चा आकडा पार करून शहराला कोरोनाने हादरा दिला आहे. 


मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनाने जोरदार धडक देऊन शहरवाशीयांच्या मनात धडकी निर्माण करणारे आकडे  शहरात कोरोना बाधित रुग्णाचे आलेले दिसून येत आहेत. आज च्या दिवसभरात शहरातील मिरारोड २३६ भाईंदर पूर्व ५५ भाईंदर पश्चिम ६२ मधिल मिळून नवीन   २६२ व संपर्कातिल ९१ मिळून ३५३ रुग्ण एकाच दिवशी मिळून आले आहेत त्यामुळे ही वाढती संख्या अशीच गतीने वाढत गेली तर परिस्थिती गंभीर परिणाम निर्माण करणारी होईल यासाठी आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी सर्व आरोग्य अधिकारी व प्रभाग अधिकारी यांची उपाययोजना कशाप्रकारे सुरू आहे या अनुषंगाने तातडीने बैठक आयोजित करत आयु्क्तांनी कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्पर कार्यवाहीचे निर्देश दिले.  आज उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण १५० आहेत तर ऐकून शहरातील बरे होणाऱ्यांची संख्या २७,७६१ आहे सध्या उपचार घेत असलेले २३९९ आहेत तर आतापर्यंत बाधित झालेले एकूण शहरातील रुग्णाची संख्या ही ३०,९८७ पर्यंत पोहचली आहे तर कोरोना मुळे मृत्यू पावलेल्याची एकूण संख्या ८२७ झालेली आहे.


कोव्हीडचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कन्टनमेंट क्षेत्राचे व्यवस्थापन व कोरोना 

बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसींग) व टेस्टिंग ४८ तासाच्या आत झाल्या पाहिजे या दोन महत्वाच्या बाबींवर विशेष लक्ष मनपा कडून देण्यात येणार आहे त्याचबरोबर लसीकरणाला गती देण्यात येईल व कोविड साथीचा प्रभाव रोखण्यासाठी विविध बाबींची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्याच बरोबर गृह विलगीकरणातील व्यक्तीच्या हातावर स्टॅंप मारण्यात यावेत व गृह विलगीकरणातील व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात येणार  असे स्पष्ट संकेत दिले आहेत. 


कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महानगरपालिकेने काही निर्बंध जारी केले आहेत त्याचे काटेकोर पालन केले जाणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर केला पाहिजे, तसेच शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर व फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करावयाचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले.  नागरिकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी केले आहे.