मिरारोड मध्ये एनआयएचा छापा , एका महिलेला घेतले ताब्यात

 मिरारोड मध्ये एनआयएचा छापा एका महिलेला घेतले ताब्यात


मीरा भाईंदर - सचिन वाझे प्रकरणात तपासा दरम्यान दररोज वेगवेगळी माहिती समोर येताना दिसत आहे . आता पर्यंत या प्रकरणात  आठ गाड्याची जप्ती केली आहे तर तीन आरोपी देखील ताब्यात घेतले आहेत. एनआयएचे पथक मनसुख हिरेन व वाझे प्रकरणात काही धागेदोरे हाती लागतील का? याचे बारकाईने लक्ष देऊन तपास करताना दिसून येत आहे. अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींपैकी एक विनायक शिंदे याच्या कळवा येथील घरामधून राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेल्या डायरीमधून महत्त्वाची माहिती समोर येताना दिसते आहे. त्यात अनेक धक्कादायक बाबीचा खुलासा समोर येताना दिसत आहे. त्याच बरोबर सचिन वाझेने विकत घेतलेल्या जिलेटिनच्या कांड्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या चौकशी नुसार अँटिलिया या इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील जिलेटिनच्या कांड्या या स्वतः सचिन वाझें याने विकत घेतल्या होत्या. मात्र या जिलेटिनच्या कांड्या त्याने कधी व कुठून विकत घेतल्या होत्या, याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. सदरच्या कांड्या नागपूरमधील सोलर इंडस्ट्रीज कंपनीने बनवलेल्या असल्याची माहिती याआधी समोर आली आहे. या कांड्याचे कनेक्शन थेट नागपूर मध्ये निघाले होते. जिलेटिनच्या कांड्या बनविणाऱ्या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून बोलवले जाण्याची शक्यता आहे. त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. याआधी नागपूर पोलिसांनी या कंपनीच्या संचालकांचा जबाब नोंदवून घेतलेला आहे. तपासात  एनआईए  कडे अनेक पुरावे यातून गोळा होताना समोर येत आहे, पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू असून एनआयएने मिरारोड मध्ये ७११ कॉम्प्लेक्स येथे असलेल्या एका फ्लॅट मध्ये छापा टाकला आणि राहणाऱ्या एका महिलेला उशिरा रात्री   ताब्यात घेतले आहे. याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 

एनआयएचे पथक  मीरा रोड येथील सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्स   दाखल झाले आहे. या कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर ४०१ वर पथकाने छापा मारला. हा फ्लॅट मागील १५ दिवसांपासून बंद अवस्थेत होता. तेव्हा  त्या फ्लॅटचे टाळे तोडून आतमध्ये प्रवेश केला. फ्लॅटची झाडाझडती घेत असताना टीमला एक महिला तिथे दिसून आली. तेव्हा टीमने त्या महिलेला ताब्यात घेतले.सचिन वाझे प्रकरण : एनआयएने छापा टाकत एका महिलेला घेतलं ताब्यातदरम्यान, त्या महिलेचे सचिन वाझेची संबंध असल्याचा संशय एनआयए टीमला आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयएची टीम मनसुख हिरेन व वाझे प्रकरणात काही धागेदोरे हाती लागतील का? याकरिता तपास करत आहे. या फ्लॅट मध्ये आणखी काही सापडले आहे का? या महिलेकडून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील का ? या महिलेचा या प्रकरणात काय संबंध समोर येणार ?  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.